मामाच्या गावाला जाऊया पण 'कोरोना' गेल्यावरच जाऊया...

corona effect on children holiday belgaum
corona effect on children holiday belgaum
Updated on

निपाणी - उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची क्रेझ आजही टिकून आहे. मात्र यंदा कोरोनाने वाटच अडविल्याने मामाच्या गावाला जाण्यास सक्तीने सुट्टी मिळाली आहे. शिवाय उन्हाळ्यातील मुलांची मौजमजा देखील कोरोनाने हिरावून घेतली आहे.

कोरोनाच्या महासंकटाने जगभरातील विविध क्षेत्रांसह वयोगटांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे. उन्हाळ्यातील सुट्टीवर गंडांतर आल्याने लहान मुले हिरमुसली आहेत. शिवाय यंदा मामाचे गाव हुकणार आहे. त्यामुळे त्यांचे चेहरे केविलवाणे दिसत आहेत. कोरोनापासून दूर राहण्यासाठी वडीलधार्‍या मंडळींकडून घराबाहेर पडू नये, यासाठी दरडावण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या गावातही सवंगड्यांसह मौजमजा करण्यावर जबर निर्बंध आले आहेत. लॉकडाऊनमुळे एक-दोन दिवसाच्या पर्यटनावरही निराशेची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे यंदाची सुट्टी ही सुट्टी नसून  जबरदस्त शिक्षा वाटत आहे. घराबाहेर न पडणे हे आपल्याला कोरोनापासून बचावासाठी अत्यंत गरजेचे आहे, हे मुलांना कोणत्या भाषेत सांगायचे हा पालकांसमोर सध्याचा यक्षप्रश्न बनला आहे.

विचित्र सुट्टीचा अनुभव

दूरचित्रवाणीवरील कार्टून, कॅरम यासह विविध खेळांना मुले केंव्हाच वैतागली आहेत. काही जणांच्या परीक्षा न होताच अशी विचित्र सुट्टी मिळाल्याने वेगळाच अनुभव येत आहे. एरव्ही हवीहवीशी वाटणारी सुट्टी यंदा मात्र नकोनकोशी झाली आहे. परिणामी कोरोना कधी एकदा जाणार, याकडे मुलांचेही लक्ष लागले आहे.

'दरवर्षी आईसोबत मी व भाऊ प्रज्योत आजोळी गडहिंग्लज जवळील महागावला व मुंबईतील आत्याकडे जातो. पण यंदा कोरोनामुळे जाणे होणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही खूप निराशा आहोत.'
- सृष्टी शरद कांबळे, निपाणी-सौंदलगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

1200-year-old Chalukya-era ancient Ganesh idol
Shirol Farmers Water Shortage
Kolhapur Sewage Projects : मुदत संपली तरी, अद्याप काम सुरूच नाही शंभर कोटींच्या सांडपाणी प्रकल्पांना गती मिळेना; प्रशासकीय काळातील मंजुरी
Gokul Election 2026 Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com