corona effect on chili market in nipani
corona effect on chili market in nipani

गृहिणींची वाढली घालमेल ; बाजारपेठेतून मिरची गायब

निपाणी - तिखटाच्या लाल मिरच्यांच्या दराचा झटका यंदा न परवडणारा असूनही बाजारपेठेतून त्या गायब झाल्याने गृहिणींची घालमेल उडाली आहे. वर्षाच्या साठवणुकीसाठी तिखट करण्याचे अखेरचे दिवस संपत चालल्याने ही घालमेल अधिकच वाढत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या किमान पाच आठवड्यापासून येथील साप्ताहिक बाजारावर प्रशासनाने लादलेल्या निर्बंधांमुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यात पुन्हा आंतरराज्य सीमा बंद झाल्याने तिखटाच्या लाल मिरचीची आवक थांबली. शहरासह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या मिरची खरेदीची गरज भागवण्यासाठी येथे गडहिंग्लज, संकेश्वर परिसरातील जवारी मिरचीसह आंध्र, कर्नाटकातून गुंटूर, बेडगी, लवंगी, रेशीमपट्टा इत्यादी प्रकारच्या मिरच्या येतात. त्या खरेदी करून निवडणे, वाळवणे, पूड तयार करून मसाला मिसळून वर्षाची बेगमी करण्यासाठी मार्च ते मे या तीन महिन्यांचा कालावधी असतो. मात्र लॉक डाऊनमुळे त्यातील ७० टक्के कालावधी वाया गेला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४० ते ६० टक्क्याने लाल मिरच्यांचे दर वाढले आहेत. शिवाय आंतरराज्य सीमा बंद आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या मिरचीची आवकच थंडावली आहे. परिणामी खरेदीसाठी धडपडणाऱ्या महिलांची निराशा होत आहे. तिखट करण्यासाठी जेमतेम महिनाभर शिल्लक आहे.
 

'तिखटासाठी मिरची विक्रीचा मार्च ते मे हा तीन महिन्यांचा हंगाम यंदा बर्‍यापैकी वाया गेला आहे. आधी आवक घटल्याने दर वाढले आता जिल्हा व राज्यबंदीने आवक थांबली.'
- सुनील मगदूम, मिरची व्यापारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com