esakal | अभयारण्यातील वाड्यांत कोरोनाची धास्ती
sakal

बोलून बातमी शोधा

अभयारण्यातील वाड्यांत कोरोनाची धास्ती

राधानगरी अभयारण्य साडेतीनशे चौरस किलोमीटर आहे. याच्या कुशीत एकोणीस वाड्या आणि गाव विसावली आहेत. गगनबावडा च्या हद्दीपासून भुदरगडच्या सीमेपर्यंत विस्तारलेल्या या जंगलात बहुतेक लोक मुंबईकडे रोजीरोटीसाठी असतात. काही कोकणात तर काही अन्य ठिकाणी मोलमजुरीसाठी. गावातील 80 टक्के लोक बाहेरच असतात. परिणामी कोरोणाचा मोठा धोका वाड्यांवर आहे. 

अभयारण्यातील वाड्यांत कोरोनाची धास्ती

sakal_logo
By
राजू पाटील

राशिवडे बुद्रुक  : "राधानगरी तालुक्‍यातील अभयारण्य आणि जंगल परिसरातील गावात व वाड्यातील चार रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने जंगल परिसराला हादरा बसला आहे. 
राधानगरी अभयारण्य साडेतीनशे चौरस किलोमीटर आहे. याच्या कुशीत एकोणीस वाड्या आणि गाव विसावली आहेत. गगनबावडा च्या हद्दीपासून भुदरगडच्या सीमेपर्यंत विस्तारलेल्या या जंगलात बहुतेक लोक मुंबईकडे रोजीरोटीसाठी असतात. काही कोकणात तर काही अन्य ठिकाणी मोलमजुरीसाठी. गावातील 80 टक्के लोक बाहेरच असतात. परिणामी कोरोणाचा मोठा धोका वाड्यांवर आहे. 
मुंबईतील चाकरमानी आता गावी परतू लागले आहेत. गावकऱ्यांनी येणाऱ्या प्रत्येकाला गावाच्या बाहेर असलेल्या मंदिरात, शाळेत किंवा मोठ्या झाडाखाली 14 दिवस विलगीकरन करून ठेवलेले असते. गेल्या आठ दिवसात हा लोंढा वाढला आहे. त्यापैकीच चार जण आज पॉझिटिव्ह निघाले. 
राधानगरी धरणाच्या डाव्या बाजूने गेलेल्या मार्गावर डिगस आणि राणोशीवाडी ही गावं आहेत. आज राणोशीवाडीत 2 तर डिगस मध्ये एक कोरोणाचा रुग्ण सापडला. बरोबर याच्या विरुद्ध बाजूला दक्षिणेकडे काळम्मावाडी तलावाच्या बाजूला वाकि घोलात असलेल्या गावठाण मध्ये एक रुग्ण सापडला. चार दिवसापूर्वी आलेल्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यासोबत विलगीकरण असलेले लोक आता हादरले आहेत. परिणामी गावात आलेल्या चाकरमान्यांकडे संशयाने पाहण्याची वृत्ती दिसू लागली आहे. 

जिल्ह्यात बाहेरून राधानगरी तालुक्‍यात येणाऱ्या प्रत्येकावर बारकाईने लक्ष आहे. मात्र येणाऱ्यांची संख्या वाढल्याने प्रशासनावर ताण वाढला आहे. अशात चार रुग्ण सापडले यामुळे आम्ही अगदी सतर्कतेने काम करत आहोत. 
मीना निंबाळकर, तहसीलदार राधानगरी 

loading image
go to top