स्वॅब तपासणीत राज्यात कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर

Now the corona test will be from a dry swab Reports will be received in less time
Now the corona test will be from a dry swab Reports will be received in less timesantosh shaligram

कोल्हापूर : कोरोना (covid-19)नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेने राज्यभरात स्वॅब तपासणीवर (Swab check) भर दिला आहे. येथील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागातील जिल्हा शासकीय प्रयोगशाळेने गेल्या अकरा महिन्यांत वर्षात चार लाख ४१ हजार स्वॅब तपासले आहेत. सर्वाधिक तपासण्या करण्यात कोल्हापूरची जिल्हा शासकीय प्रयोगशाळा राज्यात नंबर वन ठरली आहे. पाच डॉक्टर व ४५ कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेले कार्य लक्षवेधी ठरले. (covid-19-swab-examination-Kolhapur-number-one-in-the-state-covid-update-marathi-news)

जिल्ह्याची लोकसंख्या साधारण ३८ लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत चाचण्यांचे कोरोनो संसर्गला गतवर्षी मार्चमध्ये सुरवात झाली. पहिले तीन महिने कोल्हापुरात केवळ स्वॅब संकलन होत होते. त्याची तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा, तसेच मिरज शासकीय महाविद्यालयांत होत होती. बाधितांची वाढल्याने अहवाल मिळण्यासाठी वेळ लागत होता. कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी व वैद्यकीय यंत्रणांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी सुरू झाली. त्यासाठी आरएनए एक्सट्रेशनचे तीन मशिन, आरटीपीसीआरचे चार मशिन येथे बसविण्यात आली. दिवसाला दीड ते दोन हजार स्वॅब तपासले जात होते.

बाधितांची संख्या वाढू लागली तशी स्वॅब तपासणी वाढली. सध्या दिवसाला साडेतीन हजारांवर स्वॅब तपासणी होते. दिवसभरात तीन पाळ्यांमध्ये काम चालते. एका पाळीत २० ते २५ कर्मचारी असतात. स्वॅबची नोंद, गुणवत्ता, त्याचे तपशील केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेला पाठवणे असे कामाचे स्वरूप आहे. एकाच वेळी ९६ स्वॅब तपासणीला लावले जातात. त्याची तपासणी पाच तासांत होते. त्यानंतर अहवाल तयार होतात. या सर्व प्रक्रियेला नऊ तास लागतात. हे गेली वर्षभर अव्याहतपणे सुरू आहे.

जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढू लागली तसे प्रतिदिन चार हजारांवर स्वॅब संकलन होऊ लागले. त्याचे तपासणी व अहवाल नियमितपणे देण्यात येत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकमधील प्रयोगशाळांच्या तुलनेत कोल्हापुरात सर्वाधिक स्वॅब तपासणी झाली आहे.

तुलनेत सर्वाधिक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नगर, नाशिक, पुणे, ठाणे, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी येथे सर्वाधिक बाधित सापडले; मात्र तेथील प्रयोगशाळेतही कोल्हापूरच्या तुलनेत ४५ ते ५० हजारांनी स्वॅब तपासणी कमी झाली आहे.

दृष्टिक्षेपात

ऑगस्टपासून आजवर चार लाख ४१ हजार तपासण्या

आजवर एक लाख ३६ हजार बाधित

राज्यभरात एकूण ७० शासकीय प्रयोगशाळा

प्रत्येक प्रयोगशाळेत ४ ते ७ मशिन

एका प्रयोगशाळेत चार डॉक्टर व ४० ते ५० कर्मचारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com