esakal | लस घ्यायची आहे! पाहिला डोस, दुसरा डोस घेताना ही घ्या दक्षता

बोलून बातमी शोधा

null

लस घ्यायची आहे! पाहिला डोस, दुसरा डोस घेताना ही घ्या दक्षता

sakal_logo
By
लुमांकत नलवडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात लस घेण्यासाठी आता नोंदणी करणे आवश्‍यक आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही, अशांना दुसरा डोस आज दिला नाही. तर ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना आज दुसरा डोस दिला. त्यामुळे डोस पहिला असो किंवा दुसरा नोंदणी करणे आवश्‍यक आहे. तसेच वेबसाईटवर नोंदणी केली तरीही तुम्हाला लस केंव्हा मिळणार हे अत्ताच सांगता येत नाही. मात्र नोंदणी झाल्याचा एसएमएस मिळेल. ज्यावेळी लस उपलब्ध होईल, तेंव्हा तुम्हाला एसएमएसद्वारे पुढील माहिती मिळेल.

लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी ?

गुगल सर्चवर जावे. तेथे https://www.cowin.gov.in/ या वेबसाईटवर क्‍लिक करावे. त्यानंतर रजिस्टर-साईन इन युवर सेल्फ या पिवळ्या रंगातील रिव्हर्स मजकुरावर क्‍लिक करावे. यानंतर ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक द्यावा. ओटीपी क्रमांक क्षणात येतो. तो नोंद केल्यानंतर तुमची ओळख दर्शविणारे काहीही द्यावे. यामध्ये आधार कार्ड क्रमांक सुद्धा चालेल. येथील माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल. त्यानंतर त्यामध्ये तुमची नोंदणी झाल्याची माहिती मिळेल. तसेच तुम्ही केंव्हा आणि कोठे लस घ्यायची याबाबतच्या माहितीसाठी तुमच्या जिल्हा (डिस्ट्रीक्‍ट) या रकान्याच्या ठिकाणी तुमचा पीन कोड क्रमांक द्या. तेथे पुढील तारखा येतील. त्यावर क्‍लीक करा. (सध्या केवळ नोंदणी होत आहे. लस केंव्हा कोठे मिळणार याची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे मिळेल.)

लसीचा दुसरा डोस घेताना अनुभव काय ?

आयसोलेशन हॉस्पीटल येथे 45 दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेले ज्येष्ठ नागरीक गेली चार दिवस पहाटेपासून रांगेत उभे राहतात. गेली तीन दिवस त्यांचा क्रमांक येण्यापूर्वीच लस संपल्याचे सांगण्यात आले. आज मात्र त्यांचा क्रमांक आला. मात्र तेथे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून या, त्यानंतरच लस दिली जाईल, असे सांगण्यात आले. पहिली लस घेवून आज त्यांचा पन्नासावा दिवस आहे. या ज्येष्ठ नागरिकांकडे बटनाचा (स्मार्ट फोन नाही) मोबाईल आहे. त्यामुळे त्यांना नोंदणीची प्रक्रीया ऑनलाईन करता येत नाही. त्यांनी काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

अपाईमेंट घेतली, लस मिळाली...

मंगळवारी (ता.27) ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यामध्ये त्यांना आज (ता.29) अपॉईमेंट मिळाली होती. मात्र त्यावेळी सिद्धार्थनगर, पुलाची शिरोली असे पर्याय दिसत होते. बिंदू चौकातील नागरिकाने सिद्धार्थनगरला क्‍लीक करण्यापूर्वीच तो बंद झाला. पुढील पर्याय पुलाची शिरोली होता. त्यामुळे तेथे त्यांनी क्‍लिक करून, तो पर्याय निवडला होता. आज ते पुलाची शिरोली येथील आरोग्य केंद्रात पोचले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून अपॉईमेंट असल्याची माहिती घेतली. आधार कार्ड क्रमांक घेवून खात्री केली. अवघ्या अर्ध्यातासांत ते लस घेवून बाहेर पडले. दुसरी लसही त्यांना शासनाकडून मोफत मिळाली. त्यामुळे ते समाधानी झाले

.

लस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पहिला असो किंवा दुसरा डोस ऑनलाईन बुकींग करावे लागते. पहिला किंवा दुसरा डोस घेण्यासाठी आयसोलेशन हॉस्पीटलमध्ये येण्यापूर्वी ऑनलाईन बुकींग करावे. अधिकृत वेळ दिली जाईल तेंव्हाच हॉस्पीटल मध्ये यावे. यामुळे नागरिकांचा आणि यंत्रणेवरील ही ताण कमी होईल.

अमोल माने, वैद्यकीय अधिकारी महापालिका.

आकडेवारी

लाभार्थी*टार्गेट*पहिला डोस पूर्ण*टक्‍केवारी*दुसरा डोस पूर्ण*दुसरा डोस टक्केवारी

आरोग्य कर्मचारी*38,256*39,987*105 टक्के*19,993*52 टक्के

फ्रंटलाईन वर्कर

सरकारी कर्मचारी*29,821*48,898*164 टक्के*16,536*55 टक्के

45 ते 60 व ः 3,53,851 ः एकूण ः 21,188 ः एकूण

60 वयापुढील ः 15,23,372 ः3,79,266 ः 48 टक्के ः 50,303 ः पाच टक्के

जिल्ह्यातील एकूण आकडेवारी ः 15,91,449 ः 8,22,002 ः 52 टक्के ः 1,08,020 ः सात टक्के

Edited By- Archana Banage