कोल्हापूर - सावर्डेतील 'त्या' बेपत्ता बालकाची हत्या

या घटनेमुळे सावर्डे गावात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर - सावर्डेतील 'त्या' बेपत्ता बालकाची हत्या
Updated on

बिद्री : कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील या सात वर्षीय बालकाचा खून झाल्याचे आज उघड झाले. त्याच्या आजोळी सावर्डे बुद्रुक येथे त्याचा मृतदेह आज सापडला. संशयित म्हणून मुलाच्या वडिलांचा मित्र दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४५, रा. सोनाळी) याला या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दोन्ही गावांत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोल्हापूर - सावर्डेतील 'त्या' बेपत्ता बालकाची हत्या
कोल्हापुरात मैदानं गजबजणार ; खेळाडूंसाठी ॲक्शन प्लॅन तयार

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून समजलेली माहिती अशी, सोनाळी (ता. कागल) येथील वरद रविंद्र पाटील हा सातवर्षीय बालक मंगळवारी सायंकाळी आजोळी सावर्डे बुद्रुक येथे कुटूंबियांसह गेला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर गेलेला वरद घरी परत न आल्याने नातेवाईंकाकडून परिसरात त्याचा शोध घेतला. परंतू तो न सापडल्याने त्याच्या पालकांनी अज्ञात इसमाविरोधात मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली होती.

कोल्हापूर - सावर्डेतील 'त्या' बेपत्ता बालकाची हत्या
'भाजप'च्या तगड्या राणेंविरोधात सेनेच्या दोन वाघांची लागणार वर्णी?

मागील दोन दिवसांपासून पोलिस आणि नातेवाईक वरदचा शोध घेत होते. आज सकाळी सावर्डेतील लक्ष्मीनगर शेजारील शेतवडीत त्याचा मृतदेह आढळला. वरदचा मृतदेह सापडल्याची माहिती समजताच सोनाळी व सावर्डे येथील ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही गावांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुरगूड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूरला पाठवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur illegal abortion investigation
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com