VIDEO: कोल्हापुरकरांनो रस्त्यावर दिसताच होणार 'कोरोना टेस्ट'! पहा व्हिडिओ

रॅपिड अँटिजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तात्काळ विलगीकरण कक्षात दाखल
Curfew Update
Curfew Updateesakal
Updated on: 

कोल्हापूर : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर शहरात संचारबंदी आणि कठोर निर्बंध लादूनही लोक रस्त्यावर फिरत असल्याने स्थानिक प्रशासनाने आता कठोर पावले टाकायला सुरुवात केली आहे. कोल्हापुरात विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांना कोविड चाचणीला सामोरे जावे लागत आहे. संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर वाहनधारकांची वर्दळ कायम होती. आजपासून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची थेट करोना चाचणी करण्यात येणार आहे.

गेली दोन दिवस विविध कारणे सांगत वाहनधारक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.पोलिसांनी गेल्या दोन दिवसात अनेक वाहनचालकांवर कारवाई केली. काही वाहने जप्तही केली.दरम्यान, महापालिकेनेही विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होणाऱ्या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका लक्षात घेता शहरात मोबाइल व्हॅनच्या पथकाद्वारे रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी उपायुक्त निखील मोरे यांना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणुन महापालिकेच्या या पथकाद्वारे शहरातील ज्या ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी तसेच चेक पोस्ट वर कोविड टेस्ट करण्यात येत आहे.

रॅपिड अँटिजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीस तात्काळ विलगीकरण कक्षात पाठविण्यात येत आहे.शहरातील बिंदू चौक तसेच इतर चौकांमध्ये गर्दी होत असलेल्या ठिकाणी ही कारवाई होत आहे.तरी लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com