कोल्हापूर - कोजिमाशित दादा लाड यांची दादागिरी, चौथ्यांदा एक हाती सत्ता

सत्तारूढ आघाडीच्या सर्व 21 जागा विजयी
Kolhapur District Secondary Education Workers Co operative Credit Union election
Kolhapur District Secondary Education Workers Co operative Credit Union election

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था (कोजिमाशि) च्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकारी आघाडीने सर्व 21 जागा जिंकून विजयी चौकार मारला. शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू लोकशाही विकास आघाडीचा दारुण पराभव झाला. मतदारांनी दादा लाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सलग चौथ्यांदा एक हाती सत्ता देऊन शिक्षकांनी दादा यांचेच 'लाड' केले.

विजयी स्वाभिमानी सहकार आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते : सर्वसाधारण प्रतिनिधी गट- श्रीकांत कदम (4541), प्रकाश कोकाटे ( 4504), सुभाष खामकर (4634,), दत्तात्रय घुगरे (4597), अविनाश चौगुले (4560), लक्ष्मण डेळेकर (4505), शरद तावदारे (4322), मदन निकम (4455), श्रीकांत पाटील (4632), उत्तम पाटील (4596), दीपक पाटील (4727), मनोहर पाटील (4363), राजेंद्र पाटील (4493), राजेंद्र रानमाळे (4549), सचिन शिंदे (4270), पांडूरंग हळदकर (4047). अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी- अनिल चव्हाण (4691), भटक्या विमुक्त जाती – जितेंद्र म्हैशाळे (4780). इतर मागासवर्ग प्रतिनिधी राजाराम शिंदे (4835). महिला राखीव प्रतिनिधी ऋतुजा पाटील (4641) व शितल हिरेमठ (4624).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com