कोल्हापूर : तांत्रिक चुकांत अडकली भरपाई

दोन टप्प्यांत मिळाली मदतीची रक्कम; काहींना मदत, काही अद्यापही वंचित
Flood
FloodSakal

पन्हाळा - गतवर्षी पन्हाळा तालुक्यात पावसाने हाहाकार उडवला, जुलै, अॉगस्टमध्ये महापूर तसेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने जीवितहानी काही झाली; पण नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या. काही जमिनी पिकांसह खचल्या. जनावरे वाहून गेली. पश्‍चिम भागातील बाजारभोगाव गावात दुकाने पाण्याखाली गेली. रस्ते बंद झाले. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. महसूलच्या अधिकाऱ्यांनी याचे पंचनामे शासनाकडे पाठवले. शासन नियमानुसार पूरगस्तांना नुकसानभरपाई मिळाली, अजून मिळते आहे. कागदोपत्री जरी वाटप झाले तरी काही लाभार्थ्यांचे आधारकार्ड नसल्याने, काहींचे बॅंक खात्याचा नंबर चुकल्याने तांत्रिक चुकांमुळे अजूनही तहसीलदार कार्यालयात येऊन भरपाईसाठी हेलपाटे मारत आहेत.

तालुक्यात कासारी, कुंभी, वारणा, जांभळी या नद्या आहेत. सुरुवातीला बागायतीसाठी १५० रुपये गुंठा आणि जिरायतसाठी १०० रुपये गुंठा नुकसानभरपाई देण्याचे ठरले. यात केंद्र सरकारने बागायती पिकासाठी १३५ रुपये, तर राज्य शासनाने १५ रुपये तर जिरायतसाठी केंद्राने ६८ रुपये आणि राज्य शासनाने ३२ रुपये असे अनुदान दिले; पण हा निधी एकाच वेळी न आल्याने शेतकऱ्यांत संभ्रमावस्था होती. शेतकऱ्यांनी पिकाचे, घरपडीचे जादा नुकसान दाखवून त्याप्रमाणे नुकसानभरपाईची मागणी केली. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला जादा नुकसान धरून नुकसानभरपाईची मागणी शासनाकडे केली. त्याप्रमाणे शासनाकडून निधी आला, परंतु पंचनाम्यावेळी या रकमेत फरक पडल्याने सानुग्रह अनुदान, मृत जनावरांची, घर पडझडीची, दुकानदार, टपरीधारक तसेच शेती नुकसानीची रक्कम शासनाला अधिकची रक्कम परत करावी लागली.

नुकसान असे (अतिवृष्टी व महापूर)

  • शेतीचे एकूण नुकसान ६९०८ हेक्टर

  • बागायती क्षेत्र ६३३२ हेक्टर

  • जिरायत ५८५ हेक्टर

  • नुकसानग्रस्त शेतकरी २५ हजार १७६

  • वाटप झालेले नुकसान ९ कोटी ६२ लाख

  • परत निधी १ लाख १६ हजार

  • वाढीव निधी १ कोटी १६ लाख ११ हजार

  • वाढीव परत निधी ५ लाख ७६ हजार

दुकानदार - ९५२

  • भरपाई ३ कोटी ४ लाख २१ हजार

  • परत गेलेला निधी ५५ लाख ७८ हजार

    टपरीधारक - ५०

  • भरपाई ५ लाख

  • परत निधी १५ हजार

अनुदान

मृत जनावरे २७

भरपाई ५२ लाख ३ हजार

परत गेलेला निधी १६ हजार

घरपडझड - ९२२

भरपाई १ कोटी ९० लाख

परत गेलेला निधी ८० लाख ७,८५४

गोठा पडझड - २५०

भरपाई ५ लाख १७ हजार ८००

सानुग्रह अनुदान वाटप

एकूण पूरग्रस्त ३०३४

अनुदान वाटप १ कोटी, ५१ लाख ७० हजार

परत गेलेला निधी ६ लाख ६५ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com