esakal | आता कोरोना चाचणीचा तपशील मिळणार ऑनलाईन 
sakal

बोलून बातमी शोधा

Details of the Corona test will now be available online

सरकारी रुग्णालयात कोरोना चाचणी केली जाते. परंतु, तपशील उपलब्ध होण्यास विलंब होतो.

आता कोरोना चाचणीचा तपशील मिळणार ऑनलाईन 

sakal_logo
By
महेश काशीद

बेळगाव - कोरोना चाचणीचा आता ऑनलाईन तपशील मिळणार आहे. कोरोना चाचणीनंतर 2 ते 3 दिवसांनी ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यांना उपचार किंवा क्वारंटाईन संदर्भात सूचना देण्यासाठी संपर्क साधला जातो. पण, अहवाल निगेटिव्ह येणाऱ्यांना माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांची धाकधूक कायम असते. काय झाले चाचणीचे? अशी चिंता असते. त्यासाठी संकेतस्थळ विकसीत केले आहे. यामुळे सहज आणि सुलभपणे चाचणी अहवालाची शहानिशा करून घेता येते. 

सरकारी रुग्णालयात कोरोना चाचणी केली जाते. परंतु, तपशील उपलब्ध होण्यास विलंब होतो. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांना वैद्यकीय उपचार किंवा क्वारंटाईन संदर्भात माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाच्या कोविड विभागातर्फे संपर्क साधण्यात येतो. पण, ज्यांची चाचणी निगेटिव्ह येते. त्यांना माहिती मिळत नाही. काही संदर्भामध्ये मेसेज करण्यात येतो. पण, त्यात तपशील उपलब्ध नसतो. केवळ एसआरएफआयडी क्रमांक असतो. यामुळे कोरोना निगेटिव्ह रुग्णांची धाकधूक असते. चाचणी अहवालाचे काय झाले असावे? या स्वरुपाची चिंता भेडसावते. यामुळे अहवाल ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे तपशिल सुलभपणे मिळत आहे. 

चाचणी अहवाल कसा मिळेल? 

आरटीपीसीआर किंवा अँटीजेन चाचणी संदर्भात संबधीत व्यक्तीचा मोबाईल क्रमांक नमूद करून घेण्यात येतो. त्या मोबाईल क्रमांकावर एसआरएफआयडी क्रमांक मेसेज केला जातो. हा क्रमांक म्हणजे सबंधीत व्यक्तीचा एसआरएफआयडी क्रमांक असतो. 13 अंकी एसआरएफआयडी क्रमांक www.covidwar.karnataka.gov.in/service1 या संकेतस्थळी टाईप केल्यास कोरोना चाचणीचा तपशिल मिळू शकेल. 

हे पण वाचाविद्यार्थी संभ्रमात :  ऑनलाइन शिक्षण झाले सुरु मात्र परदेशी शिक्षणाची वाट बिकट


या वर्गाची हमखास कोरोना चाचणी 
ताप, सर्दी व खोकला किंवा कोरोनाची लक्षणे जाणविणाऱ्यांची चाचणी केली जाते. तसेच 55 पेक्षा अधिक वय झालेल्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कातील प्रथम आणि द्वितीय संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली जाते. याशिवाय परराज्य आणि परदेशाहून येणाऱ्यांची हमखास कोरोना चाचणी केली जाते. शिवाय क्वारंटाईनबाबत कळविले जाते. पण, या कालावधीत व्यक्तींची घालमेल सुरु असते. अहवाल काय आला आहे, त्याची औत्सूक्‍यता असते. परंतु, तपशिल ऑनलाईन मिळत असल्यामुळे प्रतिक्षा कमी झाली आहे. पुढील निर्णय घेण्यास सुलभ होणार आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top