Devendra Fadnavis | 'नाना पटोले आमच्याकडे असतानाही तसंच बोलायचे, म्हणून...' फडणवीसांचा निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadnavis

'नाना पटोले आमच्याकडे असतानाही तसंच बोलायचे, म्हणून...' फडणवीसांचा निशाणा

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मतदान पार पडणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी मोठा जोर लावला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊ महाविकास आघाडीवर निशाणा साधला. (Kolhapur Uttar Assembly Election 2022)

उत्तर कोल्हापुरात दहशतीचं वातावरण असल्याचं त्यांनी म्हटलं. या सरकारने सत्तेच्या जोरावर मतदारसंघात दहशत पसरवल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. हा महाराष्ट्र आहे की पश्चिम बंगाल, असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला आहे. (Devendra Fadnavis in Kolhapur)

यंदा भाजपची पॉलिटिकल केमिस्ट्री जमून आली आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हिंदुत्ववादी विचारांचा आहे, असं ते म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मागील दोन दिवस कोल्हापुरात काँग्रेसच्या प्रचारासाठी होते. यावेळी त्यांनी फडणवीसांवर आरोप केले. त्याला प्रत्युत्तर देताना, नानांना भगव्याचं वावडं का आहे, असा प्रतिप्रश्न फडणवीसांनी केला.

ते उगाच लांगुलचालन करतात. सर्व पक्षांमध्ये काही अल्पबुद्धीचे नेते असतात. पवारांच्या घरावर हल्ले करण्यामागे भाजपचा हात असल्याचं बोललं जात होतं. यालाही फडणवीसांनी उत्तर दिलंय पत्रकारांना या घटनेची माहिती होती. मात्र, पोलिसांना माहिती नाही पोलीस झोपले होते का, असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.

Web Title: Devendra Fadnavis Alleges Nana Patole In Kolhapur Uttar Assembly Election 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Devendra Fadnavis
go to top