esakal | सरकारने तात्काळ पूरग्रस्तांना मदत जाहीर करावी; फडणवीसांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस

सरकारने तात्काळ पूरग्रस्तांना मदत जाहीर करावी; फडणवीसांची मागणी

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : पूर येण्याचे प्रमाण वाढले असून पूरस्थितीचा सरकारने अभ्यास करायला हवा. शासनाकडून तात्काळ पूरग्रस्तांना मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. आज कोल्हापुरातील प्रयाग चिखली येथे ते दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, (Chandrkant Patil) विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) या दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा: CM Kolhapur Visit : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल

देवेंद्र फडणवीस हे तीन दिवस पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्तांशी संवाद साधत ते समस्या जाणून घेत आहेत. त्यांनी सातारा ,सांगलीचा दौरा केला आहे. आता ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. प्रयाग चिखलीतून ते शाहूपुरी कुंभार गल्ली या ठिकाणी पूरग्रस्तांना भेट देणार आहेत.

कोल्हापुरात आज महत्त्वाचे दोन मंत्री दौऱ्यावर आहेत. सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिरोळकडे रवाना झाले. नृसिंहवाडी पूरग्रस्त भागाची पाहणी करून ते नुकतेच शिरोळमध्ये दाखल झाले आहेत. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस चिखलीत आहेत. कोल्हापुरातील प्रयाग चिखली, शाहूपुरी कुंभार गल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापुराने नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना आता हे दोन मंत्री कोणती मदत देतील. याची प्रतीक्षा आहे.

loading image
go to top