सांगली जिल्ह्याने दिले धनगर समाजातील सर्वाधिक आमदार, आता गोपीचंद पडळकर कितवे ? वाचा...

dhangar community representative maharashtra legislature sangli district
dhangar community representative maharashtra legislature sangli district
Updated on

सांगली - भाजपकडून सांगली जिल्ह्यातील गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ते सांगलीतील सातवे धनगर समाजातील आमदार ठरणार आहेत. यामुळे धनगर समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत सांगली जिल्हा अव्वल ठरला आहे.

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात धनगर समाज महत्त्वाचा घटक मानला जातो.धनगर समाजाची एक व्होट बॅंक मानली जाते.विविध राजकिय पक्ष ती आपल्याकडे वळीवण्यासाठी प्रयत्नशिल असतात.यातच सांगली जिल्ह्यातील धनगर समाज राजकिय दृष्ट्या अधिक जागृत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून आतापर्यंत दिवंगत बॅ. टी. के. शेंडगे, दिवंगत अण्णासाहेब लेंगरे, दिवंगत शिवाजीराव शेंडगे, प्रकाश शेंडगे हे 4 आमदार निवडून विधानसभेत गेले तर अण्णासाहेब डांगे, प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे हे तीन आमदार विधान परिषदेत गेले. त्यापैकी प्रकाश शेंडगे यांना दोन्ही सभागृहाचे सभासद होण्याची संधी मिळाली.

धनगर समाजातील बॅरिस्टर झाले आमदार

स्वातंत्र्यानंतरच्या काळात बरिच धनगर समाजातील घराणी राजकारणात सक्रिय होती, त्यापैकी तासगावजवळच्या पेड गावचे शेंडगे घराणे होय. टी.के शेंडगे हे या कुटुंबातील बॅरिस्टर झाले होते.त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शिक्षण संस्थेची स्थापना करून सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. ते सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातून विधानसभेत निवडून आले होते. टी. के. शेंडगे हे तासगाव तालुक्यातील, मात्र जतमध्ये धनगर समाजाची संख्या मोठी असल्याने त्यांना तिथून उमेदवारी मिळाली होती. पुढील काळात अनेक वर्षे हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी आरक्षित होता.

कॅबिनेट मंत्री अण्णासाहेब डांगे

वाळवा तालुक्यातील इस्लामपूरचे अण्णासाहेब डांगे हे संघाच्या मुशील घडले. पुढे त्यांना भाजपने विधान परिषदेत संधी दिली. भाजपच्या माधव प्रयोगात ते धनगर समाजाचा चेहरा होते. त्यांनी धनगर समाज भाजपला जोडण्यासाठी संघटनात्मक बांधणी केली. डांगे यांना विधान परिषदेत भाजपचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर ते ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. 2001 ला त्यांना भाजपने पुन्हा संधी दिली नाही. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला होता, मात्र तो प्रयत्न फसल्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले.

कवठेमहांकाळचे शेंडगे घराणे

कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडीच्या शेंडगे घराण्याला विधीमंडळात मोठी संधी मिळाली. शिवाजीराव शेंडगे हे 1990 ला कवठेमहांकाळचे आमदार आणि त्यानंतर शरद पवार यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले. पुढील काळात त्यांना विजय मिळाला नाही, मात्र त्यांच्या मुलांनी राजकीय वारसा चालवला. 2004 मध्ये प्रकाश शेंडगे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले व विधान परिषदेचे आमदार झाले. त्याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवाजीराव शेंडगे यांचे दुसरे पुत्र रमेश शेंडगे यांना विधान परिषदेवर घेतले. पुढे 2009 च्या विधानसभा निवडणुकीला प्रकाश शेंडगे भाजपच्या तिकीटावर जतमध्ये उभे राहिले व विजयी झाले. प्रकाश शेंडगे यांना दोन्ही सभागृहात जाण्याची संधी मिळाली.

अण्णासाहेब लेंगरेंचा विक्रमी विजय

आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथील अण्णासाहेब लेंगरे हे कवठेमहांकाळ- आटपाडी मतदारसंघातून आमदार झाले होते. तब्बल 83 टक्के मतदान घेवून त्यांनी विक्रमी विजयी मिळवला होता. त्यावेळी आटपाडी तालुक्यातील सर्व समाजघटक त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहिले होते.

पडळवाडीचे गोपीचंद पडळकर

आटपाडी तालुक्यातील झरे जवळील पडळकरवाडी गावच्या गोपीचंद पडळकर यांनी राजकारणाची सुरवात राष्ट्रीय समाज पक्षातून केली. ते 2007 पासून 2013 पर्यंत रासपचे सांगली जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये गेले. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीत प्रवेश करत सांगली लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणूकीत पराभूत झाल्या नंतर काही दिवसात परत भाजप मध्ये परतत त्यांना बारामतीतून विधानसभेची निवडणुक लढवली होती. आता ते  भाजप कडून विधान परिषेदवर निवडून जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com