esakal | अभिमानास्पद! पोलिस महासंचालकांचे सन्मान पदक २६ जणांना; तीन अधिकाऱ्यांसह २३ कर्मचाऱ्यांचा समावेश

बोलून बातमी शोधा

null
अभिमानास्पद! पोलिस महासंचालकांचे सन्मान पदक २६ जणांना; तीन अधिकाऱ्यांसह २३ कर्मचाऱ्यांचा समावेश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पोलिस दलात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांसह २३ पोलिस अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मान पदकाने गौरविण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना नैसर्गिक आपत्ती काळात, उपनिरीक्षक विजय मस्कर आणि अमित पाटील यांना गुन्हेगारांविरोधात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ही पदके महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र पोलिस दलात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलिस महासंचालक पदाने गौरविण्यात येते. नैसर्गिक आपत्ती काळात, गुन्हेगारांविरोधात केलेल्या कारवाईसह १५ वर्षे उत्तम सेवा बजाविणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पदक देण्यात आले.

सन्मान पदकाचे मानकरी

जिल्ह्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, उपनिरीक्षक विजय मस्कर, उपनिरीक्षक अमित पाटील, सहाय्यक फौजदार काशिनाथ धुळे, सहाय्यक फौजदार शामसुंदर बुचडे यांच्यासह हवालदार संजय पडवळ, उत्तम सडोलीकर, रफिक आवळकर, मीनाक्षी पाटील, विजय पाटील, शरद पोरे, विजय निकम, दिलीप कांबळे, प्रकाश संकपाळ, सतीश चौगुले, हरी पाटील, लक्ष्मण धायगुडे, सचिन लोहार, सुनील तिबिले, नानासाहेब थोरात, भारत कांबळे, पोलिस नाईक सतीश कुरणे, विशाल साळोखे, अमित सातार्डेकर, शिपाई अमृत तिवले, सोनाली देसाई यांना पदक मिळाले आहे.

Edited By- Archana Banage