
कोल्हापुरात घडला किळसवाणा प्रकार; घोरपडवर बलात्कार!
कोल्हापूरमध्ये सर्वात किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेमध्ये आरोपीनं एका घोरपडवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करायचा हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. (Disgusting incident happened in Kolhapur man raped on Reptile Ghorpad)
हेही वाचा: विमानात महिलेसमोर चार वेळा केलं आक्षेपार्ह कृत्य; सहप्रवाशाची गुप्तचर संस्थेकडून चौकशी
सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील हा सगळ्यात किळसवाणा प्रकार असून कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा इथं एका तरुणाकडून घोरपडीवर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेची माहिती कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकणातून आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा: फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसेंना समन्स
काही तरुणांनी शिकारीसाठी आल्यानंतर एक घोरपड त्यांच्या हाती लागली. त्यानंतर यातील एकानं या मुक्या प्राण्यासोबत हे धक्कादायक कृत्य केलं. दरम्यान, अशा प्रकारची घटना समोर आल्यानंतर आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची यावर वनाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होती.
Web Title: Disgusting Incident Happened In Kolhapur Man Raped On Reptile Ghorpad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..