Kolhapur : जि. प.च्या ६२ शाळांची बत्ती गुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

light latur

जि. प.च्या ६२ शाळांची बत्ती गुल

sakal_logo
By
युवराज पाटील-सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : वीज बिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या ६२ शाळांचे वीज कनेक्शन कायमचे, तर ८६ शाळांचे तात्पुरत्या स्वरुपात तोडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत शैक्षणिक विद्युत उपकरणे वापरता येत नाहीत. शाळांची वीज बिल भरण्यासंबंधी आर्थिक तरतूद असते की नाही असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

राज्यभरात सध्या थकित वीज बिलापोटी महावितरणने कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात जि.प.शाळांकडे १३२५ वीज कनेक्शन आहेत. सध्यस्थितीत ११७७ कनेक्शनचा वीजपुरवठा सुरू आहे. तोडलेल्या ८६ वीज कनेक्शनची थकबाकी ६ लाख ५६ हजार इतकी आहे, तर ६२ कनेक्शनपैकी ८६ हजार ७७२ इतकी थकबाकी आहे. ११७७ कनेक्शन जरी सुरू असली तरी त्यांची ५४ लाख २४ हजार इतकी थकबाकी आहे.

जिल्हा परिषदेच्या सुमारे दोन हजाराहून अधिक शाळा आहेत. विद्यार्थी संख्या सुमारे पावणेदोन लाखांवरती आहे. केंद्रीय बोर्ड तसेच इंग्रजी शाळांच्या बोलबाल्यातही जि. प. शाळांनी गुणवत्ता दाखविली आहे. पूर्वी चौथी तसेच सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळांतील विद्यार्थीच राज्याच्या गुणवत्ता यादी झळकायचे. शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी दरवर्षी उपक्रम राबविले जातात. मध्यंतरी इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांनी जि. प. शाळांत प्रवेश घेतला. यावरून शाळांची गुणवत्ता सिद्ध होते.

loading image
go to top