रणधुमाळी; जिल्हा बँकेची प्रारूप यादी प्रसिद्धीची तारीख ठरली

प्राधिकरणाचा निर्णय; उद्यापासून ठरावांची होणार छाननी
Election
ElectionElection

कोल्हापूर : जिल्हा बँकांच्या निवडणुकीवरील स्थगिती राज्य सरकारने उठवल्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) (KDCC) निवडणुकीसाठी ३ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला.(Kolhapur district Bank election 2021) दरम्यान, राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका होत असून काही विभागीय सहनिबंधकांकडे दोनपेक्षा जास्त जिल्हा बँकांच्या मतदार यादीचे काम असल्याने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी होणारा उशीर गृहीत धरून ३ सप्टेंबर ही तारीख निश्‍चित केली आहे. (kolhpaur)

‘केडीसीसी’साठी ठराव संकलनाची प्रक्रिया यापूर्वीच संपली आहे. बँकेच्या एकूण ११ हजार ४४८ सभासद संस्थांपैकी ८५०० संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत. उद्यापासून (१३) दाखल झालेल्या संस्था ठरावांची छाननी होणार आहे. कोल्हापूर विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्हा (satara district Bank) बँकेचा समावेश आहे. या तिन्हीही बँकांच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्येच संपली आहे. त्यामुळे या तिन्हीही बँकांच्या प्रारूप मतदार याद्या ३ सप्टेंबर रोजीच प्रसिद्ध होतील.

Election
डोंगरच गावात कोसळला ; तिवरेत परिसरात 5 किमी डोंगराला भेगा

सद्यस्थितीत बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे बँकेचे नेतृत्व करत आहेत. शिवसेनेचे दोन तर काँग्रेसचे पाच संचालक आहे. अपक्ष एका संचालकांसह ‘जनसुराज्य’चे दोन संचालकही सत्तारूढ गटासोबत आहेत. ‘जनसुराज्य’चे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी राज्याच्या राजकारणत आपण भाजपसोबत असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ प्रमाणेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते सत्ताधाऱ्यांसोबतच राहतील, अशी शक्यता आहे.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला

जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. या बदललेल्या समीकरणानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकासआघाडीचे सरकार अस्तित्‍वात आले. हाच फॉर्म्युला जिल्हा बँकेच्याही कायम राहणार आहे.

Election
बौध्दवाडी व चिंद्रवलीत जमीन खचली; 9 कुटुंबाना स्थलांतराच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com