'दिवी दिवी' चा संघर्ष अस्तित्वासाठी!

हा वृक्ष नष्ट झाला तर दिवी दिवी पुन्हा दिसणार नाही; कारण तो अन्यत्र कुठेही नाही.
'दिवी दिवी' चा संघर्ष अस्तित्वासाठी!

कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयासमोर दिवी दिवी वृक्ष (divi divi tree) दिसतो. या वृक्षावर महावितरणच्या वीजतारा आहेत. महावितरण दरवर्षी त्याच्या फांद्या तोडते. रस्ते करताना वृक्षाच्या खालील बाजूस कॉंक्रिट ओतले आहे. हा वृक्ष नष्ट झाला तर दिवी दिवी पुन्हा दिसणार नाही; कारण तो अन्यत्र कुठेही नाही. आपल्या अस्तित्वाशी तो संघर्ष करीत आहे.

उपयोग

  • जखम धुण्यासाठी शेंगांचा काढा वापरतात

  • शेंगेतील काळसर रंग सुती-लोकरी कपडे रंगविण्यासाठी

  • लाकडातील तांबडा रंग टाकीतील तयार होणारे शेवाळ नष्ट करतो

  • शेंगेतील टॅनिनपासून गोगलगाईचे निर्मूलन

  • कातडी कमविण्यासाठी टॅनिन मिळते

  • बिया काढलेल्या शेंगांचे चूर्ण पाळीच्या ज्वरात देतात

  • जीर्ण ज्वरात जुलाब बंद होण्यासाठी सुगंधी पदार्थाबरोबर सालीचा काढा देतात

'दिवी दिवी' चा संघर्ष अस्तित्वासाठी!
पंखाना मिळाले बळ; खंड्यासह चार पिल्लांची गगनभरारी

विचित्र नावे

  • वेस्ट इंडिज, मध्य अमेरिकेत दिवी दिवी

  • पूर्वीचे शास्त्रीय नाव लिबीडिबी कोरिआरिया होते, ते नंतर बदलले

  • आफ्रिकन देशांत कॅसकालोट, गुराकाबुया, गुटापाना, नॅक्सकोल

  • इंग्रजीत ‘अमेरिकन सुमॅक’

  • कुराकाओ देशात ‘बेटापाना’ असे नाव

  • मराठीत काही जण ‘देवशेवर’ म्हणतात

आकारही चित्र-विचित्र

वृक्षाच्या फांद्या उंच न वाढता सर्व बाजूंनी खाली झुकलेल्या, एकाच बाजूस वाढलेल्या असतात. यामुळे हे वृक्ष चित्र-विचित्र आकारांचे दिसतात.

मूळ स्थान

हा वृक्ष मूळचा मध्य अमेरिकेतील मेक्सिको, वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन बेट, उत्तर-दक्षिण अमेरिका भूप्रदेश, आफ्रिका खंडातील घाना, कांगो, युगांडा, टांझानिया, मॉरिशस आदी देशांत आढळतो.

भारतात कसा आला?

प्रामुख्याने समुद्र किनारपट्टीवर वाढलेला दिसतो. प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांत तो स्थायिक झालेला दिसतो. १९०१ मध्ये ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ थियोडर कुक यांनी प्रकाशित केलेल्या ‘फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’ पुस्तकात या वृक्षांची नोंद उत्तर-दक्षिण कन्नड, धारवाड, बेळगाव, पुणे या ठिकाणची आहे.

'दिवी दिवी' चा संघर्ष अस्तित्वासाठी!
सेंबियन महादेवी : मंदिरनिर्माती राणी

"दिवी दिवी विदेशी वृक्ष असून, महाराष्ट्रात फक्त तो मुंबई, पुणे, कोल्हापूर शहरात दिसतो. जिल्ह्यात हा वृक्ष आता एकमेव असल्याने बागांत, रस्त्याशेजारी, शेतात लावला पाहिजे. संरक्षण-संवर्धन केले पाहिजे."

- प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com