esakal | घागरीत तोंड अडकलेल्या श्वानाची अखेर 4 वर्षांनी सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

dog

गेल्या २ वर्षांपासून या टीमचे सदस्य चोकाक येथे जाऊन या श्वानाला पकडण्याचा प्रयत्न करत राहिले.

घागरीत तोंड अडकलेल्या श्वानाची अखेर 4 वर्षांनी सुटका

sakal_logo
By
सुयोग घाटगे

कोल्हापूर : अनावधानाने घागरीत तोंड अडकलेल्या श्वानाची सुटका करून त्याला सुखरूप सोडण्यात अखेर चार वर्षांनी यश आले. अनेक ठिकाणच्या ऍनिमल रेस्क्यू पथकांनी प्रयत्न करून न जमलेली कामगिरी कोल्हापूरच्या पप्पूदा पिपल फॉर ऍनिमल या पथकाने पार पाडली. या श्वानाच्या सुटकेची चोकाक वासियांनी आनंद व्यक्त करत पथकाचे आभार मानले.

चोकाक येथे ४ वर्षापूर्वी भटक्या श्वानाचे डोके प्लास्टिकच्या घागरीमध्ये अडकले. गावकऱ्यांनी अनेक वेळा या श्वानांची या त्रासातून सुटका करण्याचा प्रयत्न पण केला. मात्र प्रत्येक वेळी भीतीने हे श्वान गावाबाहेर, शेतामध्ये लपून बसत असत. कालांतराने अस्वस्थ झालेल्या श्वानाने ही घागर कशी बशी फोडण्यात यश मिळवले. मात्र अजूनही अर्धी घागर या श्वानाच्या गळ्यात अडकून होती. नंतर शिल्लक राहिलेली घागरही तुटून पडली मात्र घागरीच्या जाड कंडा मात्र गळ्यात राहिला.

हेही वाचा: पालगड गणेशोत्सवासाठी मुंबईच्या गव्हर्नरची सनद

येथूनच खऱ्या त्रासाला सुरवात झाली. हे श्वान मोठे होईल तसे त्याच्या गळ्यातील हा कंडा एखाद्या फासाप्रमाणे आवळू लागला. अखेर गावकऱ्यांनी इंटरनेटच्या मदतीने ऍनिमल रेस्क्यू पथकांना पाचारण केले. अनेक ठिकाणाहून रेस्क्यु पथके येत होती, मात्र हाती नैराश्याचा येत होती. या श्वानाला वाचवण्यासाठी अखेर पप्पूदा पिपल फॉर ऍनिमलच्या पथकाने प्रयत्न सुरु केले.

गेल्या २ वर्षांपासून या टीमचे सदस्य चोकाक येथे जाऊन या श्वानाला पकडण्याचा प्रयत्न करत राहिले. याही पथकाला अनेक वेळा निराशाच हाती लागली. मात्र जिद्द न सोडलेल्या या पथकाने पुन्हा प्रयत्न करत अखेर हे श्वान पकडले. या श्वानांची अवस्था अत्यंत नाजूक झाली होती. घागरीचा कंडा गळ्याभोवती आवळला होता.

हेही वाचा: आता शेतकरी रक्ताने पत्र लिहिणार नाही, त्यामुळे कोणी राजकीय स्टंट करू नये...

कंड्याच्या तीक्ष्ण कड्यांनी मानेला खोलवर जखम केली होती. ही जखम बळावली होती. या पथकाने शिताफीने हा कंडा काढून या श्वानाला चार वर्षांच्या वेदनेतून मुक्त केले व योग्य ते उपचार करून सोडून दिले. ही कामगिरी पिपल फॉर ऍनिमल चे अध्यक्ष प्रशांत साठे, मार्क गर्दे, अशिष खरबडे यांनी पार पाडली. या ठिकाणी कराड, सांगली, कोल्हापूर सह कर्नाटक मधीलही काही रेस्क्यू टीमने प्रयत्न केले होते. या सह गावकरीही प्रयत्न करत होते. मात्र सातत्याने या श्वानाने प्रत्येकालाच हुलकावणी दिली होती.

loading image
go to top