Ambabai Temple : अंबाबाई चरणी तब्बल एक कोटी 14 लाखांचं दान; मंदिर आवारातील 12 देणगीपेट्यांतील मोजणी पूर्ण

Ambabai Temple : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांकडून ही मोजणी सुरू होती.
Ambabai Temple Kolhapur
Ambabai Temple Kolhapuresakal
Updated on: 
Summary

नवरात्रोत्सवात सुमारे साडेतेरा लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते. मंदिर आवारातील एकूण बारा देणगीपेट्यांतील मोजणी पूर्ण झाली.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात (Sharadiya Navratri Festival) करवीर निवासिनी श्री अंबाबाई (Ambabai Temple) चरणी भाविकांनी एक कोटी १४ लाख ४३ हजार २१० रुपयांचे दान अर्पण केले आहे. बुधवार (ता. २३) पासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील अभिषेक मंडपात भाविकांनी दिलेल्या देणगीची मोजदाद सुरू होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com