शासनाने जनभावनेचा आदर करून प्रकल्पाला जमीन देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी बैठकीत केली.
कोवाड : दुंडगे (ता. चंदगड) येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला (CM Solar Agriculture Scheme) गायरानमधील जमीन देण्याबाबत ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्याअनुषंगाने ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत बैठक घेतली; पण ग्रामस्थ आपल्या मतावर ठाम राहिले. त्यांनी जमीन देण्याला कडाडून विरोध दर्शवला.