esakal | गरोदरपणात कोरोना टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

बोलून बातमी शोधा

null

गरोदरपणात कोरोना टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

sakal_logo
By
नंदिनी नरेवाडी-पाटोळे

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत चालली आहे. खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. अनेक देशांत काळजी म्हणून महिलांनी गर्भधारणाही करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्याकडे महिलांनी अधिकची काळजी घेतली पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेण्याकडे सुशिक्षितांचा वाढता कल आहे. खबरदारी घेऊनच गर्भधारणा करू शकता, असे मत ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, संशोधक डॉ. सतीश पत्की यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. मात्र, गर्भधारणेपूर्वी कोविड 19 च्या लशीचे दोन्ही डोस पूर्ण करूनच गर्भधारणेसाठी प्रयत्न करावेत, असे सांगत लसीकरणाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

गरोदरपणात कोरोना टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?

* बाहेरचे पदार्थ खाणे पूर्णतः टाळावे

* बाहेर न जाता घरातच व्यायाम करावा

* नियमित प्राणायाम, श्‍वसनाचे व्यायाम करावेत

* ताजा व सकस आहार घ्यावा

* गरोदरपणात नेहमीची औषधे घेता येत नाहीत

* झिंक, व्हिटॅमिन डी, बी कॉम्प्लेक्‍स ही औषधे घ्यावीत

गरोदरपणात कोरोना झाल्यास

* लक्षणे दिसताच गृहअलगीकरणात राहावे

* गरोदरपणात आरटीपीसीआर टेस्टसोबत एक्‍सरे काढू नये

* एक्‍सरे काढायचा झाल्यास पोटावर वेगळे शिल्ड वापरावे

* कोरोना निवारणासाठी पूरक औषधे घ्यावीत

प्रसूतीदरम्यान कोरोनाबाधित झाल्यास

* ज्या रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन व इतर सुविधा आहेत, तेथे प्रसूतीस प्राधान्य द्यावे

* बाळंतिणीची खोली नेहमी स्वच्छ ठेवावी

* सतत हात धुवावेत

नवजात बालकाची काळजी

* आई किंवा नवजात बालक कोरोनाबाधित असले तरी स्तनपान द्यावेच

* स्तनपान देताना मास्क वापरावा

* गरोदरपणात कोरोना होऊन गेल्यास बालकाची रक्ततपासणी करून अँटिबॉडीज टेस्ट करावी

...तर बालकाची कोविड तपासणी

प्रसूतीदरम्यान माता कोरोनाबाधित असल्यास नवजात बालकालाही कोरोना होण्याचा धोका असतो. त्यामुळे नवजात बालकाच्या प्लेटलेटस्‌ कमी होतात, हृदयाच्या ठोक्‍यांचा वेग कमी होतो, प्रतिकारशक्तीही कमी होते. अशी लक्षणे आढळल्यास बालकाची कोविड टेस्ट करून औषधोपचार करावेत.

गरोदर मातांना कोरोना होण्याचा धोका असतो. गरोदरपणातील, प्रसूतीनंतर काळजीसोबतच गर्भधारणेपूर्वी लसीकरण करून घेतल्यास आई व नवजात बालकाच्या दृष्टीने धोका टाळता येऊ शकतो. लसीकरणानंतरही गरोदरपणात कोरोनाचा संसर्ग झाल्यास व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन किंवा इतर इंजेक्‍शनची गरज भासत नाही. गरोदर माता बऱ्या होऊ शकतात.

- डॉ. सतीश पत्की, ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ

Edited By- Archana Banage