
Kankavali : कणकवली तालुक्यातील जानवली कृष्णनगरी येथील स्वयंभू दत्त मंदिरातील पाच हजार रुपये किमतीची पंचधातूची मूर्ती मध्यरात्री पाऊणच्या सुमारास चोरट्यांनी चोरली. या दरम्यान, सीसीटीव्हीचा सायरन वाजल्याने चोरटे कटावणी व पाच गोळ्या भरलेले पिस्तूल घटनास्थळी टाकून पसार झाले. कणकवली पोलिसांनी तीन पथके नेमत तपासाला गती दिली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती जाधव यांनी दिली.