डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला सलग तिसरे पेटंट

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च' विभागातील संशोधकांनी दाखल केलेल्या तिसऱ्या पेटंटला भारतीय पेटंट प्राधिकरणाची मान्यता मिळाली.
DY Patil
DY PatilSakal

कोल्हापूर - येथील डी. वाय. पाटील (DY Patil) अभिमत विद्यापीठाच्या (Abhimat University) 'सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च' विभागातील संशोधकांनी (Research) दाखल केलेल्या तिसऱ्या पेटंटला (Patent) भारतीय पेटंट प्राधिकरणाची मान्यता मिळाली. ऊर्जा साठवणुकीसाठी उपयोगी अशा नाविन्यपूर्ण 'कोबाल्ट फॉस्फेट फिल्म्स' बनविण्याच्या सोप्या आणि कमी खर्चिक 'सिलार' या रासायनिक पद्धतीसाठी पेटंट जाहीर झाले.

रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे व मुख्य संशोधक डॉ. उमाकांत पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, संशोधक विद्यार्थी प्रणव काटकर, सुप्रिया मरजे यांचा संशोधनात सहभाग होता. संशोधन पद्धतीसाठी २०१९ ला संशोधकांनी पेटंट अर्ज दाखल केला होता. तो २७ ऑगस्ट २०२१ ला संशोधकांच्या नावे मंजूर झाला. शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्वक शोध पद्धती पुढील २० वर्षांसाठी विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल.

DY Patil
कोथळी: जबरी चोरीच्या परिसरात पोलिस अधिक्षकांची पाहणी

कुलसचिव डॉ. भोसले म्हणाले, "दोन महिन्यांत विद्यापीठाला मिळालेले सलग तिसरे पेटंट आहे. ही बाब विद्यापीठ व संशोधकांसाठी आनंददायी आहे." डॉ. पाटील म्हणाले, "सिलार या सोप्या व प्रभावी पद्धतीने तयार केलेल्या 'कोबाल्ट फॉस्फेट फिल्म्स” या विविध अनुप्रयोगांसाठी जसे की, विद्युत घट, सुपरकॅपॅसिटर, उत्प्रेरक अभिक्रियामध्ये अत्यंत कार्यक्षम ठरल्या आहेत. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (DST-SERB CRG/ INSPIRE) अर्थसाह्य संशोधनासाठी महत्वाचे ठरले."

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष गृह-राज्यमंत्री सतेज पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरु डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरु डॉ. शिम्पा शर्मा, अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी, परीक्षा नियंत्रक सल्लागार अरुण पोवार, परीक्षा नियंत्रक डॉ. ए. एन. जाधव, बायोटेक विभागप्रमुख डॉ. मोहन करुपाईल यांनी संशोधकांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com