esakal | शिवधनुष्य पेलले तर 'हा' भाग होईल ग्रीन बेल्ट

बोलून बातमी शोधा

शिवधनुष्य पेलले तर 'हा' भाग होईल ग्रीन बेल्ट
शिवधनुष्य पेलले तर 'हा' भाग होईल ग्रीन बेल्ट
sakal_logo
By
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा

आर. के. नगर, (कोल्हापूर) : हरित कोल्हापूरचा उद्देश साध्य करायचा असेल तर शेंडा पार्क, आर. के. नगर, राजाराम कॉलेज, कृषी महाविद्यालय, मिलिटरीच्या विस्तीर्ण जागेत सुबाभूळ, ग्लिरिसिडिया वनस्पतीचे प्राबल्य खूप आहे. या पट्ट्यात तसेच राजाराम तलाव येथे पाणथळ जागेच्या निर्देशांक प्रजाती आणि सभोवताली पक्ष्यांना आकर्षित करणारी झाडे लावून हा परिसर समृद्ध करण्यास वाव आहे. येथे 30 ते 35 हजार देशी झाडे लावून जगविणे शक्‍य आहे. कोल्हापूर महापालिका, विविध संस्था, संघटनांनी ही शिवधनुष्य पेलले तर हा भाग ग्रीन बेल्ट म्हणून विकसित होईल; पण त्यासाठी निर्धाराची गरज आहे.

वड, पिंपळ, पायर, रबर वड, कदंब, मोहा, बेहडा ही देशी झाडे महाकाय वाटतात; मात्र या झाडांना मोठी जागा लागते. दीर्घकालीन विचार केला तर ही शतायुषी स्थानिक झाडे जैवविविधतेच्या अनुषंगाने खूप मोलाची आहेत. परिसर उपलबद्धता अन्‌ भविष्यकालीन विचार करूनच ही झाडे लायला हवी. विजेच्या तारा, इलेक्‍ट्रिक पोलच्या खाली कमी उंचीची तसेच झुडुपवर्गीय झाडे लावता येतात. याबरोबर कमी जागा, अरुंद रस्ते, बोळ येथे झुडुपवर्गीय वनस्पती लावली तर परिसर हिरवा राहिल.

ही झाडे येऊ शकतात

-बहावा, कांचन, पुत्रंजीवी, सुरंगी, उंडी, बकुळ, फिल्याशियम, टेरागोटा अलाटा, समुद्रशोक, चाफा, नागचाफा, शिवण, कडूलिंब, सातवीण, गुळभेंडी, करंज, करमळ, अर्जुन

-आंबा, फणस, जांभूळ, चिंच ही फळवर्गीय सदाहरित झाडे

-पळस पांगारा, काटेसावर, मोई. चारकोल ही झाडे पक्ष्यांसाठी आवश्‍यक

-जारूल, सीता अशोक, पांढरा एकसोरा, लक्ष्मीतरु, पारिजातक

-कैलासपती, ब्रह्मदंड, मणीमोहर, उर्वशी

-अनंत, बिकसा, अडुळासा, एकसोरा, हमेलिया प्याटर्न, अंजनी, कवठी चाफा, हिरवा चाफा, कोरांटीच्या विविधरंगी झुडुपवर्गीय प्रजाती, कुंती, रातराणी

-विलायती चिंच, सिंगापूर चेरी

-शेवगा, हादग्याची लागवड

-दुतर्फा पादचारी मार्गावर हळदी-कुंकू, टारफेटा, खुळखुळा, हस्तीशुंडी, पानफुटी

-पाम, बांबूच्या विविध प्रजाती

-जयंती, गोमती नाल्याच्या दुतर्फा अर्जुन, उंबर, करंज, पारजांभूळ, वाळूंज अशी निर्देशांक जाती लावणे

अडथळे काय?

-लोक वस्ती भरपूर

-मानवी हस्तक्षेप

-विद्युत तारांचे जाळे

-रस्ता रुंदीकरण, अपार्टमेंटस्‌चे जाळे

-वाहतुकीची कोंडी

असे हवे संरक्षण

-जाळ रेषा तयार करावी

-वाळूचे पट्टे करावेत

-घायपात, निवडूंग, निर्गुंडीचे झाडे हवी

विदेशी तणांचा शिरकाव ही गंभीर समस्या आहे. रानमोडी, कॉंग्रेस गवत, कुरडूचा शिरकाव मोठ्या प्रमाणात आहे. या तणांचे व्यापक निर्मुलन होणे आवश्‍यक आहे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपण विचार वैश्विक, कृती स्थानिक अन वैयक्तिक प्रतिसाद या उक्ती प्रमाणे हरित कोल्हापूरला हातभार लावू शकतो. गरज आहे ती संकल्प, निर्धाराची.

-सुहास वायंगणकर, सदस्य, महाराष्ट्र वन्यजीव मंडळ

Edited By- Archana Banage