इम्पीरिकल डेटा मिळाल्यावरच निवडणुका; हसन मुश्रीफ

मंत्री मुश्रीफ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय इमारत हॉलचे उद्‌घाटन
hasan mushrif
hasan mushrifsakal

कागल : सर्वोच्च न्यायालयाच्या(supreme court) निकालानंतर ओबीसी आरक्षण(obc arakshan) झीरो टक्के झाले आहे. इम्पीरिकल डेटा(empirical deta) मिळायला तीन-चार महिने वेळ लागणार आहे. त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(election) होतील. तोपर्यंत या निवडणुका पुढे जातील. पण, विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ(hasan mushrif) यांनी सांगितले.कागल नगर परिषदेच्या दलित वस्ती निधीतून एक कोटी खर्च करून बांधलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय इमारत हॉलचा उद्‌घाटन समारंभ, विजयराव शहा, ब्याकुडे, भुरले, पालकर पाणंद रस्त्याचा प्रारंभ ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. तसेच पैलवान (कै.) रसुल इस्माईल मुश्रीफ यांच्या स्मरणार्थ छत्रपती राजर्षी शाहू कुस्ती आखाडा पायाभरणी समारंभ उपमहाराष्ट्र केसरी पै. रवींद्र पाटील यांच्या हस्ते झाला. नगराध्यक्षा माणिक माळी अध्यक्षस्थानी होत्या.

ते म्हणाले, की कागल शहरांमध्ये (kagal city)विकासकामे दर्जेदार करण्यासाठी पार्टी मीटिंगमध्ये कामाचे नियोजन करण्यात आले. त्यामुळेच ही कामे दर्जेदार होऊ शकली. रस्ते पाणी गटर याव्यतिरिक्त तरुणांच्या शरीर व बुद्धी याचा विचार करणे गरजेचे आहे. पुढील तीन वर्षांत कागल तालुक्यातील खेडोपाड्यात कोणतेही काम शिल्लक राहणार नाही याचे नियोजन केले आहे. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता देण्याचे काम आपण करू. कागल शहरातील राहिलेली कामे येत्या काळात पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, विशाल पाटील (मळगेकर), नगरसेवक विशाल पाटील (मळगेकर), प्रमोद पाटील, अतुल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले उपनगराध्यक्ष विवेक लोटे, रमेश माळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, अशोक जकाते, पी.बी. घाटगे, नामदेवराव पाटील , नितीन दिंडे, सौरभ पाटील, आनंदा पसारे, संजय चितारी, रमेश पाटील, प्रकाश नाळे , पै. मारुती पोवार, अजित कांबळे, मुख्याधिकारी पंडित पाटील आदी उपस्थित होते. नगरसेवक प्रवीण काळबर यांनी स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com