कळपाच्या प्रतीक्षेत संतापतोय गणेश तस्कर

पाटणे वनपथक गेली काही वर्षे हत्तीच्या हालचालींचे निरीक्षण नोंदवत आहे. पाटणेतील हत्तींचा कळप (कुटूंब) हे फक्त जंगली भागात वावर होते.
Elephant
ElephantSakal
Updated on

कोल्हापूर - कुटुंबातील कर्ता गडी घरा बाहेर पडल्याने त्या घरची माय मुलांना जगवण्याची धडपड नेटाने करीत आहे. घरातील गड्या विनाच एकाकी फिरणाऱ्या मायच्या कुटूंबावर स्वामीत्व हक्क गाजविण्यासाठी बाहेरचा दुसराअनोळखी नायक पुढे सरसावला. त्यासाठी तो भलतीच आक्रमकता दाखवत दहशत निर्माण करीत आहे. तरीही ति माय आपल्या दोन्ही पिल्लांना त्या नायकापासून दूर ठेवत आहे. इतक्यात तो घरा बाहेर गेलेला तो कर्ता गडीही कुटूंबाजवळ पून्हा येत आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात विस्कळीत झालेले हे कुटूंब पून्हा स्थिरस्थावर होताना त्या खलनायकासोबत संघर्ष घडतो की काय अशी शंका व्यक्त होत आहे.

ही घटना कोणत्या नागरी कुटूंबाची नाही तर ती चंदगड पाटणे वनहद्दीतील हत्तींच्या त्या कळपाची आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तींना ओळखण्यासाठी त्यांना कुटूंबाची उपमा दिली आहे. गेल्या चार वर्षापासून पाटणे भागात हत्तींचा एक कळप एक नर, एक मादी दोन पिल्लांसमावेत वावरतोय. त्यांना आण्णा, माय व बारक्या व छोटू अशा नावाने वनविभागच नव्हे तर गावकरीही ओळखत आहेत. तर आजऱ्याच्या जंगलातील गणेश टस्कर हत्ती आता चंदगड पाटण्याकडे वळला आहे. गेल्या दोन महिन्यात त्याने आक्रमकता दाखवत शेतीपिके,पाण्याच्या टाकी, पाईप लाईन पासून ते ट्रॉली, छप्पर सोंडेने धुडकावत नुकसान केले आह. चंदगड पाटणे मार्गावरील गावागावात गणेश टस्करची दहशत सद्या आहे.

Elephant
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याची रायगडावर जय्यत तयारी

पाटणे वनपथक गेली काही वर्षे हत्तीच्या हालचालींचे निरीक्षण नोंदवत आहे. पाटणेतील हत्तींचा कळप (कुटूंब) हे फक्त जंगली भागात वावर होते. यातील मोठा नर (आण्णा) कळप सोडून सप्टेंबरमध्ये दोडामार्गाच्या जंगलात गेला. तेव्हापासून मादी (माय) दोन पिल्लांना (बारक्या छोटू)ला घेऊन पाटण्याच्या वीस किमी जंगलात फिरत आहे. याच वेळी आजऱ्यातील उमदा नायक टस्कर हत्ती (गणेश) तो या कळपाजवळ येऊ लागला. तेव्हा मादीने पिल्लांसह सतत ठिकाणे बदलत चकवा दिला. तेव्हा गणेश टस्करला कळपात सामील होण्याची संधी मिळेणा झाली. तो या कळपापासून अवघ्या एक दोन किलो मीटरच्या हद्दीतच वावर आहे. याच वेळी दोडा मार्गातून आण्णा परत आला तो कळपापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.

हे दोन्ही नर येत्या एक दोन महिन्यात कळपाजवळ येतील तेव्हा नर किंवा मादी आक्रमक होऊन संघर्ष करीत गावच्या शेतहद्दीत उपद्रव वाढवतील अशी शंका व्यक्त होत आहे. यासाऱ्या वनविभागाचे पथक काळजीपूर्वक रात्रंदिवस लक्ष ठेवून आहे.

‘गणेश टस्कर सद्या आक्रमक आहे, तर मादीचा कळप जंगलात असला तरीही जंगला नजीकच्या भागात त्याचा वावर हो शकतो. अशा स्थितीत गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी हत्तींना इजा पोहचेल ते बिथरतील असे कोणतेही कृत्य करू नये.’

- दत्ता पाटील, वनपाल पाटणे

हत्तीचे हे कुंटूंब गेली चार वर्षे पाटणे चंदगड भागात आहे एक पल्लू तिन वर्षार्चे तर एक पिल्लू एक ते दिड वर्षाचे आहे. याकाळात नर मादी कायम पिल्ला सोबत होती मात्र नर काही महिन्यापूर्वी दोडमार्गाच्या जंगलात गेला तिल्लरीचा १२ कीमीचा घाट उतरून खाली गेला. तो परत येई पर्यंत या कळपातील मादी फक्त पिल्लां सोबत आहे. आजऱ्यातील गणेश टस्कूर हा नर या कळपा जवळ आहे मात्र मादी पिल्लांचे रक्षण करताना या टस्करला जवळ येऊ देत नाही. गेली दोन महिने हा प्रकार वनविभाग टिपत आहे.

गणेश टस्कर आक्रमक आहे रात्री अपरात्रीही गावच्या शेतीत हद्दी गावात घसतो त्याला रोखणे जंगलात परतवणे काम जोखमीचे आहे या हत्तीचा आक्रमकपणा पहाता मोजक्या वनकर्मचाऱ्यांची पथकाची दमछाक होते मात्र वन कर्मचारी कसोसीने परस्थिती हाताळत आहेत. मात्र हत्तीचा आक्रमकपणा पाहाता कर्मचाऱ्यांनी ही काळजी घेणे गरजे आहे. असे मत निर्सग प्रेमी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com