तानाजी याला रोहित सुतार याने चेष्टामस्करी करीत पाण्यात ढकलले. तानाजीला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
गारगोटी : येथे अभियांत्रिकी शिक्षणानिमित्त (Engineering Education) शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. विहिरीशेजारी तो कपडे धूत असताना मित्राने चेष्टामस्करी करीत त्याला विहिरीत ढकलले असता तो पाण्यात बुडाला. तानाजी भागोजी बाजारी (वय १८, रा. फये धनगरवाडा) असे त्याचे नाव आहे. या घटनेची भुदरगड पोलिसात (Bhudargad Police Station) नोंद झाली. याप्रकरणी पोलिसांनी रोहित सुतार (रा. गारगोटी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.