Kolhapur Crime : सापावर पाय पडल्याच्या भीतीनं इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तापानं फणफणतं होतं अंग, CPR मध्ये नेलं पण..

भीतीपोटी अर्णव माझाही सापावर पाय पडला, असे सांगत होता.
Arnav Navnath Chougule
Arnav Navnath Chouguleesakal
Summary

घरच्यांनी सर्पदंश झाला असेल या भीतीपोटी सीपीआरमध्ये (CPR Hospital) उपचार सुरू केले.

कुडित्रे : वाकरे (ता. करवीर) येथे बालकाचा सापावर (Snake) पाय पडल्याच्या भीतीने ताप येऊन मृत्यू झाला. अर्णव नवनाथ चौगले (वय ८) असे त्‍याचे नाव आहे.

Arnav Navnath Chougule
पुसेसावळी दंगलीत ठार झालेल्या नूरहसन शिकलगारच्या कुटुंबीयांची पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली भेट; म्हणाले, दंगल पूर्वनियोजित की..

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गावातील एका खासगी इंग्रजी शाळेत (English Medium School) इयत्ता दुसरीमध्ये अर्णव शिकत होता. गुरुवारी तो शाळेला गेला होता. शाळेतून आल्यानंतर त्याला जोरात ताप भरून आला. याच दिवशी गावात आणखी एका तरुणाला सर्पदंश झाल्याची चर्चा होती.

Arnav Navnath Chougule
Pusesawali Riots : 'मुस्लिमांविरुद्ध भडकावू वातावरण निर्माण करणाऱ्या विक्रम पावसकरांना अटक करा'; पुसेसावळी दंगलीचा साताऱ्यात निषेध

या भीतीपोटी अर्णव माझाही सापावर पाय पडला, असे सांगत होता. या भीतीने त्याला ताप आला. घरच्यांनी सर्पदंश झाला असेल या भीतीपोटी सीपीआरमध्ये (CPR Hospital) उपचार सुरू केले. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी त्याला एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. ताप वाढल्याने अर्णव कोम्यात गेला. उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com