बंदी आदेशातही कोवाडला भरला बाजार

Even With The Ban Order, Kowad Filled The Market Kolhapur Marathi News
Even With The Ban Order, Kowad Filled The Market Kolhapur Marathi News
Updated on

कोवाड ः किणी कर्यात भागावर अजूनही कोरोनाचे सावट असताना गुरुवारी येथे आठवडी बाजार भरल्याने लोकांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार गेल्या दोन महिन्यांपासून बंद होता. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील सर्व आठवडी बाजार बंद आहेत. अशा स्थितीत कोवाड येथे आठवडी बाजार भरल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी किणी कर्यात भागातील कोवाड, निट्टूर, तेऊरवाडी, कमलवाडी, राजगोळी बुद्रूक, कुदनूर, शिनवगे या सात गावांतून बाहेरुन आलेल्या लोकांतून 16 कोरोना रुग्ण आढळले. सर्व रुग्ण त्या-त्या गावच्या अलगीकरणात होते. त्यामुळे त्यांचा संसर्ग झाला नाही. सुदैवाने उपचारांती सर्वच रुग्ण आता घरी परतले आहेत. पण पुणे, मुंबई व अन्य राज्यातून अजूनही काही लोक येत आहेत. अशा स्थितीत कोवाड येथील आठवडी बाजार भरविणे धोकादायक ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

बाजारपेठेशी परिसरातील 20 ते 25 खेड्यांतील लोकांचा संपर्क असल्याने लवकर बाजार भरविणे धोक्‍याचे ठरू शकते. तरीही गुरुवारी आठवडी बाजार भरला होता. बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाली होती. तोंडाला मास्क न लावता ग्राहक उघडपणे बाजारात खरेदी करत होते. सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जाच उडाला होता. तालुक्‍यातील एकाही आठवडी बाजाराला परवानगी मिळाली नसताना कोवाड येथील आठवडी बाजार मात्र भरविला जात आहे. 

चौकशी केली जाईल
तालुक्‍यातील कोणत्याही गावातील आठवडी बाजार सुरू करण्याला परवानगी दिलेली नाही. तरीही कोवाड येथील आठवडी बाजार भरविला जात असेल, तर त्याची चौकशी केली जाईल. 
- विनोद रणावरे, तहसीलदार, चंदगड 

ग्राहकांची गर्दी
कोवाड येथील आठवडी बाजाराला ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली नाही. तरीही गुरुवारी बाहेरील व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाली. याबाबत ग्रामपंचायत लवकरच योग्य तो निर्णय घेईल. 
- विष्णू आडाव, उपसरपंच, कोवाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com