कोरोना काळातही 'महसूल'चे शंभर टक्के कर्मचारी कामावर, "या' तालुक्‍यात प्रांताधिकाऱ्यांनी केले कौतुक

Even During The Corona Period, One Hundred Percent Of The Revenue Staff Was On Duty Kolhapur Marathi News
Even During The Corona Period, One Hundred Percent Of The Revenue Staff Was On Duty Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : महापूर असो अथवा निवडणुका. महसूल कर्मचारी नेहमीच युद्धपातळीवर काम करीत असतो. सध्याच्या कोरोनाच्या काळातही महसूलचे शंभर टक्के कर्मचारी कामावर रूजू आहेत. महसूल विभाग कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आघाडीवर राहून लढा देतो. अशा या विभागाची प्रतिमा आणखीन उंचावण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सामुहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केले. 

येथील तहसील कार्यालयातर्फे महसूल दिन साजरा करण्यात आला. तहसीलदार दिनेश पारगे यांनी प्रास्ताविकात महसूल दिनाची माहिती दिली. सभापती रूपाली कांबळे, उपसभापती श्रीया कोणकेरी, नगरसेवक हारूण सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. 
श्रीमती पांगारकर म्हणाल्या, ""कोरोनासारख्या कठीण काळात महसूल कर्मचाऱ्यांनी चांगली साथ दिली आहे. महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.'' 

सभापती कांबळे, उपसभापती कोणकेरी, सय्यद यांचीही भाषणे झाली. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. निवडणूक नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे यांनी आभार मानले. उत्कृष्ठ कामाबद्दल निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील, बुट्टे, मंडल अधिकारी म्हाळसाकांत देसाई, लिपीक चंद्रकांत पालकर, प्रकाश कुंभार, तलाठी युवराज सरनोबत, साजिदा काझी, प्रशांत पाटील, किरण आंबूलकर, शिपाई रमेश कवठणकर, कोतवाल किरण कांबळे यांच्यासह संगणकीकृत सातबारामध्ये उत्कृष्ठ काम केल्याबद्दल मंडल अधिकारी एस. एस. माळी, तलाठी डी. एस. दुधाळ, शरद मगदूम, विलास कातकर, काझी यांचा सत्कार झाला. 

अहोरात्र परिश्रम
कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी तत्पर असणारा महसूल विभाग आहे. गतवर्षीचा महापूर असो अथवा आताचा कोरोना. पी. एम. किसान सन्मान योजना, ऑनलाईन सातबारा उतारा, वसूली आदी मोहिमेत महसूल विभाग अग्रेसर आहे. सर्वच कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून युद्धपातळीवर काम केले. लोकांना गतीमान आणि तत्पर सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी यापुढेही सतर्क रहावे. 
- दिनेश पारगे, तहसीलदार 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com