esakal | धक्कादायक! गिरगावच्या माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू; जिल्ह्यात खळबळ

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! गिरगावच्या माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू; जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! गिरगावच्या माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू; जिल्ह्यात खळबळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एका खाजगी हॉस्पिटलला वेळेवर ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोणा बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सीजनचा तुटवडा भासत असल्याचे स्पष्ट झाले.

संबंधित खाजगी रूग्णालयाच्या डॉक्टरांनीच संबंधित रुग्णांच्या मृत दाखल्यावर रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा वेळेत न झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. गिरगाव तालुका करवीर येथील 75 वर्षीय माजी सैनिकाला शहरातील एका खाजगी रुग्णालयात सव्वीस एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

काल रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली होती.आज सकाळी ऑक्सिजनसाठी रुग्णालय प्रशासनाने दीड तास प्रयत्न केले. पण ऑक्सिजन मिळाला नाही त्यातच या रुग्णाचा मृत्यू झाला.

Edited By- Archana Banage