
कोल्हापूर : दरवर्षी योजनेसाठी ८ ते १० कोटींचा खर्च; तीर्थक्षेत्रांचा विकास
कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रमुख ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र/यात्रास्थळांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्याचे धोरण २० वर्षांपासून राबवण्यात येत आहे. या दोन दशकांत जिल्ह्यातील तब्बल ४६८ तीर्थक्षेत्रांचा विकास केला आहे. यासाठी सुमारे २०० कोटींपेक्षा अधिकचा खर्च केला आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहण्याच्या व्यवस्थेपासून, पाणी, स्वच्छतागृह आणि सुशोभीकरणाची कामे केली आहेत. अनेक तीर्थक्षेत्रातील सुविधांमुळे काही प्रमाणात उत्पन्नही मिळत असून, त्याचा तीर्थक्षेत्राच्या विकासाला उपयोग होत आहे.
हेही वाचा: स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरी आपण जातव्यवस्थेच्या कचाट्यातच: हायकोर्ट
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र, यात्रास्थळे आहेत. ही तीर्थक्षेत्रे त्या गावासह पंचक्रोशीतही प्रसिद्ध आहेत. दरवर्षी येथे यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांना योग्य पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्या देणे आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायतींना परवडणारे नाही. त्यामुळेच उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ पाहता तीर्थक्षेत्र विकासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळेच शासनाने जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळातूनच तीर्थक्षेत्रांची यादी निश्चित होत होती. मात्र, २०१७ पासून जिल्हा परिषद सदस्यांनी शिफारस केलेल्या व निकषात बसत असणाऱ्या तीर्थक्षेत्रांचाही समावेश करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांची जिल्ह्यातील संख्या लक्षणीय आहे. पंचक्रोशीत एखादे तरी मोठे तीर्थक्षेत्र असल्याचे पाहायला मिळते.
हेही वाचा: 'बाहेरचे असलो तरी मुंबईनं आम्हाला स्विकारावं, 14 वर्षे झाली...'
तीर्थक्षेत्र निवडीचे निकष
दररोजच्या भाविकांची संख्या २०० ते ५००
वर्षभरात १ लाख लोकांची भेट
पोलिस अधीक्षकांचा दाखला
तीर्थक्षेत्र विकासाबाबत ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्टचा ठराव
जमिनीचा सात-बारा व आठ ‘अ’ उतारा
या कामांचा होतो समावेश
यात्रास्थळ ते मुख्य रस्ता, पोहोच रस्ता
यात्रास्थळ मार्गावर पथदिवे
संरक्षण भिंत
शौचालय व स्नानगृहाचे बांधकाम
परिसर सुधारणा
वाहनतळावर पेव्हिंग ब्लॉक
यात्रास्थळापासून जवळ भक्तनिवास बांधणे
पिण्याच्या पाण्यासाठी टाकीव नळाद्वारे पाणीपुरवठा
जिल्ह्यातील ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास ग्रामपंचायतींना शक्य नव्हता. प्राचीन मंदिरे असूनही त्याचा जीर्णोद्धार असो की पायाभूत सुविधा. यासाठी ग्रामपंचायतींना निधीची अडचण होती. ती जिल्हा नियोजन मंडळाने दूर केल्याने तीर्थक्षेत्रांचा विकास होत आहे.
- सतीश पाटील, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद
ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व प्रमुख ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांची यादी तयार केली आहे. नव्यानेही यात तीर्थक्षेत्रांचा समावेश होत आहे. ज्यावर्षी जो प्रस्ताव येईल, तो त्याच वर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर करण्यात येत आहे. तीर्थक्षेत्र विकासाला निधी कमी पडणार नाही.
- अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग
Web Title: Expenditure 8 To 10 Crore Annual Scheme District 30 Lakh Per Annum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..