लबाजे हा व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी धमकी व त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून, तसेच बसाना याच्याकडून हातउसणे घेतलेले अडीच लाख परत करण्यासाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून नागोंडा यांनी आत्महत्या केली.
सांगवडेवाडी : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून हलसवडे (ता. करवीर) येथे शेतकऱ्याने (Farmers) गळफास घेऊन आत्महत्या केली. नागोंडा शंकर पाटील (वय ५२, हलसवडे, ता. करवीर, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. बाबासाहेब पारीसा लबाजे (८२, कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि मधू मगदूम बसाना (५२, रा. पिंपळगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या खासगी सावकारांची नावे आहेत.