esakal | शेतकऱ्यांनी ई-पिक नोंदी करून प्रशासनाला सहकार्य करावे- वाघमोडे
sakal

बोलून बातमी शोधा

 e pik

शेतकऱ्यांनी ई-पिक नोंदी करून प्रशासनाला सहकार्य करावे-वाघमोडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेसरी: शेतकऱ्यांनी जबाबदारी ओळखून मोबाईल अॅपद्वारे ई-पिक नोंदी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन गडहिंग्लजचे उपविभागीय प्रातांधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले. तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतध्ये आयोजित राज्य शासनाच्या ई-पिक नोंदी जनजागृती मोहीम कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा: आजऱ्यात बांबूच्या कोमच्याची शेती

उपसरपंच युवराज पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी १०० टक्के ई-पिक नोंदी करून प्रशासनाला सहकार्य करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी सोडला. वाघमोडे म्हणाले, महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी तात्काळ ई-पिक नोंदी कराव्यात. सात-बारा शेतीचा आत्मा असून तो कोरा न ठेवता ई-पिक नोंदी करून शेतीचे सौंदर्य जोपासत शासकीय योजनांचा सुलभ लाभ घ्या, अन्यथा वेळेत ई-पिक नोंदी न भरल्यास शासकीय योजनांचा लाभ घेताना आडचणी निर्माण होतील.

मंडळ अधिकारी एस. जी. राजगोळे यांनी ई-पिक नोंदी करताना येणाऱ्या आडचणीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे तांत्रिक मार्गदर्शन केले. नारायण शिटयाळकर, दादासाहेब पाटील, सुरेश तुरटे, राजेश भारती यांनी ई-पिक नोंद बाबत सूचना, प्रश्न उपस्थित केले. दिनकर पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

माजी सरपंच गोपाळ देसाई, शिवाजी गुरव, पोलीस पाटील मलाप्पा नाईक, सुरेश पाटील, दिनकर मेटकर, संभाजी पाटील, संदीप पाटील, विलास नाईक, गणपती तुपूरवाडकर, सचिन लोहार, शंकर धनके, विनायक देसाई, प्रशांत तुरटे, आवबा खणगावकर, पांडूरंग पाटील, परशराम पाटील, बाळू देसाई, लक्ष्मण जाधव, राजाराम पाटील, विलास भारती, यमाजी नाईक, बाबू पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तलाठी एस. व्ही. नाकाडी यांनी आभार मानले.

loading image
go to top