अद्याप हरकतींवर सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसबळाचा वापर करून मोजणी सुरू आहे. असे आम्ही होऊ देणार नाही.’
जयसिंगपूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील (Ratnagiri-Nagpur National Highway) चोकाक ते उदगाव या गावातील बाधित शेतकऱ्यांनी (Farmers) उजळाईवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. चौपट भरपाई द्यावी, उदगाव बायपास महामार्गावरून होणारा महामार्ग न्यावा, हरकतीवर सुनावणी झाल्याशिवाय मोजणी करू नका, अशा मागण्या केल्या. शिवाय ‘डोकं फोडून घ्यायचं असेल तर जमीन मोजणीला या’ असा इशारा या शेतकऱ्यांनी प्रकल्प संचालकांना दिला.