गुंतवणुकीनंतर पहिल्या टप्प्यात दीड लाख रुपये व दोन वेळा पन्नास हजार रुपये रोख स्वरुपात दिले. त्यामुळे सचिन पाटील यांचा विश्वास वाढला.
कोल्हापूर : एक लाखाच्या गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला वीस टक्के परतावा देण्याच्या आमिषाने तब्बल ४१ लाख ८५ हजारांची फसवणूक (Money Fraud) केल्याप्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल झाला. वैभव कृष्णात पाटील आणि कृष्णात बापूसाहेब पाटील (दोघे रा. बालिंगा पाडळी खुर्द, ता. करवीर) अशी त्यांची नावे असल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले. ही फसवणूक आठ जून ते ४ सप्टेंबर २०२१ दरम्यान झाली आहे.