esakal | मोबाईल चोरट्यांमुळे सांगलीकरांत भीती
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

मोबाईल चोरट्यांमुळे सांगलीकरांत भीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने सर्व बाजारपेठांसह व्यवहार सुरळीत होत आहे. साहजिकच खरेदीदारांची गर्दी वाढत आहे. अशात मोबाईल लंपास करणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याने सांगलीकर भयभीत झाले आहे. दोन दिवसांत गणेशोत्सवासाठी खरेदीस आलेल्या ग्राहकांकडून शहर, विश्रामबाग परिसरात तेरा मोबाईल चोरीला गेल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे. दिवसाला एक मोबाईल शहरातून चोरल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

आठवडा बाजारात सहजपणे मोबाईल चोरले जात आहेत. गर्दीत मोबाईल लांबवल्यानंतर एकमेकांकडे तो दिला जातो. पकडायचे तरी कोणाला? असा प्रश्‍न येतो. त्याठिकाणी विशेष खबरदारी बाळगण्याची गरज आहे. आत्तापर्यंत शेकडो मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यातील अपवाद वगळता एकही चोरटा पोलिसांचा हाती लागलेला नाही.

गणेशोत्सवानिमित्त झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मारुती रोडवरून सात आणि विश्रामबागमधील गणपती मंदिर परिसरातून सहा मोबाईल हातोहात चोरून नेली. तसेच गेल्या काही महिन्यांत सकाळच्या वेळी घराचा दरवाजा उघडा असता चोरटे घरात घुसून मोबाईल चोरी करत आहे. विश्रामबाग, गावभाग, बसस्थानक परिसरातील गर्दीच्या ठिकाणी भरदिवसा हे प्रकार होत आहे. क्षणात मोबाईल गायब करून चोरटे पसार होत आहे. त्यामुळे मोबाईल चोरीचा तपास करणे पोलिसांना आव्हानात्मक झाले आहे.

गुन्हेगारांच्या टोळ्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार कारागृहातून बाहेर आले आहे. त्या गुन्हेगारांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र सद्य:स्थितीत दिसून येत आहे. यासाठी पोलिसांनी शहरात गस्तीपथके वाढवली असून, भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन केला आहे. मात्र, चोऱ्या रोखणे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

loading image
go to top