flight | कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नव्या वर्षापासून दररोज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नव्या वर्षापासून दररोज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी : सध्या अनियमित असलेली कोल्हापूर- मुंबई विमानसेवेबाबत आनंदाची बातमी असून नवीन वर्षात एक जानेवारीपासून आठवड्यातील सातही दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. याबाबत डीजीसीएकडून हिरवा कंदील मिळाला आहे. ही सेवा देणारी ट्रू जेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ ला याची माहिती दिली.

सध्या कंपनीच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे कोल्हापूर- मुंबई विमान सेवा काही काळासाठी स्थगित आहे. मागील काही दिवसांपासून वारंवार मुंबई विमानसेवा खंडीत होत असल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आठवड्यात कधी एक दिवस तर कधी दोन दिवस असे संचलन होत होते. काहीवेळा संपूर्ण आठवडा ट्रू जेट कंपनीची विमानसेवा खंडित होत होती. विमानसेवा नियमित सुरू करण्याची प्रवाशांची आग्रही मागणी आहे. या सेवेला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील आठवड्यापासून निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे आठवड्यातील तीन दिवस नियमित विमानसेवा सुरू होत आहे. नवीन वर्षात मात्र सातही दिवस विमान सेवा सुरू राहणार असल्याचे जेट कंपनीचे अधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले.

विमानांची संख्या मर्यादित व उपलब्ध विमाने इतर मार्गावर वळविल्यामुळे कोल्हापूर - मुंबई विमानसेवा वारंवार खंडीत होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. नियमित विमान सेवा पुरवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संबंधित कंपनीकडे तीव्र पाठपुरावा करण्याची गरज आहे, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे.

कोट कोल्हापूर मुंबई विमानसेवा ला प्रतिसादही चांगला आहे . नवीन वर्षात ट्रू जेट कंपनीकडून कोल्हापूर मुंबई विमान सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख होत असून आठवड्यातील साठी दिवस विमान सेवा पुरवण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत होतो त्याला आता यश आले आहे. रणजीत कुमार कटारिया अधिकारी ट्रू जेट

loading image
go to top