esakal | पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य - केंद्रीय समिती
sakal

बोलून बातमी शोधा

पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य - केंद्रीय समिती

पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य - केंद्रीय समिती

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : राज्याच्या तुलनेने कोल्हापुरातील (kolhapur district) रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे. परंतु इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात दुसरी लाट वेळाने आली आहे. हे गंभीर आहे असं काहीच नाही. कोल्हापुरातील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण (covid vaccination) झाले आहे. सध्या ६० वयोवर्षावरील ७८ लोकांचे लसीकरण झाले आहे. कोल्हापुरातील रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट (positivity rate) टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. सध्या तो १० पेक्षाही कमी असून जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्णही नाहीत. शिवाय तिसऱ्या लाटेचीही तयारी केले असल्याची माहिती केंद्रीय समितीचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (pradip aavate) यांनी दिली. 

पुर क्षेत्रातील पावणे दोनशे गावांच्या लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रदीप आवटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: कैद्यांना मिळणार पॅरोलचा बोनस ; शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

यावेळी ते म्हणाले, राज्याच्या तुलनेत निश्चितच कोल्हापुरात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मात्र सध्या एकूण शेकडा मृत्यूचे प्रमाण हे 2.9 वरून 2.6 वर आले आहे. सध्या प्रत्येक मृत्यूचे डेट ऑडिट सुरू आहे. याची कारणं काय आहेत? ते कशा पद्धतीने टाळता येईल यासाठी प्रशासन डॉक्टर प्रयत्न करत आहेत. सध्या लसीकरण वेगाने करणे खूप गरजेचे आहे. प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. अजून काही प्रयत्न करता येईल याबाबत चर्चा करत आहोत. 

लसीकरणाच्या पुरवठ्याबाबत केंद्रीय पथक (central committee) यांनी राज्याच्या आरोग्य सचिवांची भेट घेतली आहे. राज्यांना अधिक लसीचा पुरवठा व्हावा, अशी मागणी सचिवांनी केली आहे. केवळ कोल्हापूरच नाही तर देशाच्या पातळीवर राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १७ पीएसआय प्लांट उभे केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ऑक्सिजन क्षमता वाढणार आहे. जे नागरिक गृह अलगीकरण करणार आहेत, त्यांचे प्रमाण ग्रामीण भागात 27 टक्के आहे. देशभराच डेल्टाचे प्रमाण आढळून येत आहे. परंतु डेल्टा प्लसचे रुग्ण कमी आहेत असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: गणपती बाप्पा मोरया! तारदाळची गणेशमूर्ती थेट इंग्लंडच्या घरात

loading image