esakal | Kolhapur Flood Update :पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज ; हसन मुश्रीफ यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Flood Update : ''पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज''

Flood Update : ''पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज''

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात दोन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. तरीही जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पाऊस असाच सुरू राहून महापुराची परिस्थिती उदभवली तरी या पूर (Kolhapur Flood) परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज दिली.(Flood-control-in-the-kolhapur-district-Hasan-Mushrif-latest-news-akb84)

मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पंचगंगा नदी पातळी इशारा पातळी ओलांडून ४० फुटांवर गेली आहे. त्यामुळं पुराची धोका पातळी गृहीत धरूनच प्रशासनाने नियोजन केले आहे. आज प्रयाग चिखली या गावातील ३२५ पूरग्रस्त कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.

शहरातील रामानंद नगर या भागातील पाणी शिरलेल्या सात कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय, अजून दोन दिवस असाच पाऊस पडत राहिला, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. परंतु आज परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा अभ्यास करून सूक्ष्म नियोजन केले आहे. यापूर्वी आलेल्या महापूर काळात प्रशासन सज्ज होते, तसे आजही प्रशासन सज्ज आहे.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्हा धोका पातळीकडे ; नागरिकांचे स्थलांतर सुरू

चिपळूण सारखी परिस्थिती सध्यातरी कोल्हापुरात नाही त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अजून कितीही पाऊस पडला तरी जीवित हानी होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली असल्याच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मुश्रीफ यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग योग्य प्रमाणात होतोय का नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक अधिकारी या ठिकाणी ठेवला जाणार आहे. अशी माहिती दिली.

loading image