Kolhapur Rain Update - राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी बंद

सायंकाळपर्यत महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता
Kolhapur Rain Update - राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी बंद
Updated on: 

शिरोली पुलाची : सांगली फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर (national highway) महापुराचे पाणी आल्याने पुण्याकडील वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूरकडे (kolhapur flood) जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक पोलिस प्रशासनाने (police) सुरु केली आहे. पाणी पातळीत सातत्याने पाणी पातळीत वाढ होत असून, सायंकाळपर्यत महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

संततधार पावसामुळे (heavy rain) काल सायंकाळी सेवा मार्गावर पाणी आले होते. त्यानंतर २४ तासातच दुपारी अडीच वाजता पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी आले. सुमारे दीड ते दोन फुट पुराचे पाणी मार्गावर असताना, त्यामधून पुण्याच्या दिशेने होणार्‍या वाहतूक सुरू होती ; त्यानंतर तासाभरतच यामार्गावरील पाणी वाढल्याने, बॅरेक्टस लावून वाहतूक बंद करण्यात आली. यानंतर कोल्हापूरकडे (kolhapur rain update) जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. पंचगंगा नदी पात्रातील पाणी पातळी सातत्याने वाढत असून, आणखी एक - दीड फूट पाणी वाढल्यास हे पाणी महामार्ग दुभाजकावरून वाहू लागले. त्यानंतर हा महामार्ग बंद होईल. सायंकाळपर्यंत संपुर्ण वाहतूक ठप्प होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. वाहनधारक व प्रवशांनी धोका पत्करून प्रवास करू नये असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे

Kolhapur Rain Update - राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी बंद
कोल्हापूरचा पाऊस - वाहतुकीची कोंडी; नाले तुंबले, शहर थांबले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Milk Union five nominated directors ordinance
Kolhapur Municipal Corporation approves outsourcing of employees to address staff shortages across departments.
Satej Patil statement on Gokul chairman election
Gokul Milk Union Ordinance