esakal | वन विभागाचा छापा : वन्य प्राण्यांचे अवयव तस्करी चे साहित्य जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

वन विभागाचा छापा : वन्य प्राण्यांचे अवयव तस्करी चे साहित्य जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नृसिंहवाडी : येथे आज सायंकाळी साडे सात वाजता वन विभागाने छापा टाकून माळेवाले दुकानदार यांच्या कडून वन्य प्राणी चे अवयव व तस्करी करणारे साहित्य जप्त केले. अचानक झालेल्या कारवाई मुळे आज एकच गोंधळ उडाला होता. तीन तास कारवाई सुरू होती.

येथील माळेवाले दुकानदार वन्य जीव प्राण्यांची तस्करी करीत असल्याची माहिती आज सायंकाळी वन अधिकारांना मिळाली त्यानुसार आज सायंकाळी साडे सात वाजता छापा टाकून कारवाई करण्यात आली. यात प्रवाळ ( समुद्रातील एक जीव ) अंध श्रद्धासाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर घोरपडीचे अवयव, रान डुकरांचे दात, वन्य प्राण्यांची नखे, इंदजाल, शंख अदि साहित्य जप्त करण्यात आले आहे.

करवीर वन विभागाच्या परिक्षेत्र उपवनसंरक्षक आर आर काळे, सहाय्यक वन संरक्षक सुनील निकम, रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील, वनपाल राँकी देशा, वनरक्षक रूकेज मुल्लाणी, वनरक्षक जोनवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी टाकळीवाडी येथील एकास ताब्यात घेतले आहे.

दरम्यान कारवाई सुरू असताना माळेवाले समाजातील महिलांनी विरोध करीत आम्ही काय केलं नाही. असे म्हणत आक्रोश केला. मात्र वन विभागाने पुरावे जप्त करीत प्रयोगशाळेत पाठविले असून वन्यजीव अपराध नियंत्रण शाखा यांच्या वतीने पुढील तपास करण्यात येत आहे

नूसिहवाडी येथे करवीर वनविभागाच्यावतीने माळ विकणार्‍या कडून, वन्य प्राणी यांच्या अवयव, नखे या सह अनेक मुद्देमाल जप्त करून कार्यवाही करण्यात आली. वन्यजीव अपराध नियंत्रण शाखा यांच्या वतीने पुढील तपास करण्यात येत आहे.

छाया जितेंद्र आणुजे, नृसिंहवाडी

loading image
go to top