कोल्हापूर : ‘आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात सैन्यदल, पोलिस, सीआरपीएफ जवान यांच्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. मात्र, त्यांनी प्रथमच पर्यटकांवर (Pahalgam Terror Attack) भ्याड हल्ला केला आहे. याची खोलवर चौकशी करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सोमवारी केली. ते ‘केडीसीए’ आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.