लॉकडाउनचा फटका...आजऱ्यात 73 पैकी चार गावांत शंभर टक्के करवसुली

In Four Villages In Ajara Tax Collection One Hundred Percent Kolhapur Marathi News
In Four Villages In Ajara Tax Collection One Hundred Percent Kolhapur Marathi News
Updated on

आजरा : आजरा तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या वसुलीवर यंदा कोरोनामुळे परिणाम झाला. तालुक्‍यातील ग्रामपंचायतीची घरफाळा व पाणीपट्टी वसुली यंदाच्या आर्थिक वर्षात 25 टक्केने घटली आहे. ग्रामपंचायतीच्या प्रशासन यंत्रणेला दरवर्षीप्रमाणे उद्दिष्ट साध्य झाले नसले तरी तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीने 60 टक्‍क्‍यांवर उद्दिष्ट्ये गाठले. 73 ग्रामपंचायतीपैकी मेंढोली, सुलगाव, आवंडी व देऊळवाडी या चार ग्रामपंचायतीची वसुली शंभर टक्के झाली. 

आजरा तालुक्‍यात घरफाळ्याचे यंदा 2 कोटी 87 लाख 45 हजार, तर पाणीपट्टीचे 1 कोटी 92 लाखांचे उद्दिष्ट होते. मात्र कोरोनामुळे ऐन वसुलीच्या काळात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे वसुली ठप्प झाली. गावपातळी बरोबर तालुका पातळीवरील प्रशासन यंत्रणा कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेत अडकली. वसुलीवर मोठा परिमाण झाला.

घरपट्टीचे 76 टक्के, तर पाणीपट्टीचे 77 टक्के उद्दीष्ट्ये साध्य झाले. तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीने 60 टक्केच्यावर उद्दीष्ट्ये गाठले आहे. यामध्ये अनेक ग्रामपंचायतीची वसुली ही 70 ते 80 टक्केपर्यंत झाली आहे. पाच ग्रामपंचायतीची वसुली ही 96 टक्केपर्यंत झाली आहे. गतवर्षी दहा ग्रामपंचायतीची वसुली मार्चअखेर शंभर टक्के झाली होती. यंदा मात्र चार ग्रामपंचायतीची शंभर टक्के वसुली झाली आहे. गतवर्षीच्या वसुली यंदा सन 2020 ते 21 च्या आर्थिक वर्षात करण्यावर भर राहणार असल्याचे ग्रामपंचायत विभागातून सांगण्यात आले. 

दृष्टिक्षेप 
- गतवर्षी 10 ग्रामपंचायतीची, तर यंदा 4 ग्रामपंचायतीची शंभर टक्के वसुली 
- पाच ग्रामपंचायतीची 96 टक्के वसुली 
- घरपट्टीचे 76, तर पाणीपट्टीचे 77 टक्केचे उद्दिष्ट्ये साध्य 

25 टक्के वसुलीमध्ये घट
दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीचे नियोजन केले होते. वसुलीच्या काळात कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने वसुलीवर परिणाम झाला. 25 टक्के वसुलीमध्ये यंदा घट झाली आहे. 
- डी. डी. माळी, पी. जी. चव्हाण, विस्तार अधिकारी पंचायत, आजरा 

संपादन : सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Weather Update
Maharashtra Sugar Season 2026
UPI Transaction Charges on Payments
Gokul election 2026 Mahayuti formula in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com