गडहिंग्लजला एप्रिलपासून चतुर्थ वार्षिक कर

The Fourth Annual Tax In Gadhinglaj from This April Kolhapur Marathi News
The Fourth Annual Tax In Gadhinglaj from This April Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : नगरपालिका हद्दीतील मालमत्तांसाठी एप्रिलपासून चतुर्थ वार्षिक कर आकारणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मार्चअखेरची वसूली संपल्यानंतर लवकरच या प्रक्रियेला प्रारंभ होणार असून यामध्ये मालमत्तांच्या मोजमापासह घरफाळा आकारणीचीही नव्याने फेररचना होणार आहे. चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या निमित्ताने पालिकेच्या महसुलात काही अंशी वाढ अपेक्षित आहे. 

शासनाच्या सुचनेनुसार दर चार वर्षांनी पालिका आणि महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्तांची चतुर्थ वार्षिक कर आकारणी होत असते. त्यासाठी अस्तित्वातील मालमत्तांसह नव्याने उभारलेल्या इमारतींचाही सर्व्हे करून मोजमाप निश्‍चित केली जाते. सध्या मूळ पालिका हद्दीत सहा हजारावर मालमत्ता आहेत. हद्दवाढीनंतर किमान दोन हजारावर मालमत्ता पालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. या सर्व मालमत्तांचे मोजमाप केले जाणार आहे. 

चतुर्थ वार्षिक कर आकारणीपूर्वी शहराचे झोन पाडले जातात. ज्या-त्या भागातील नागरी सुविधांचा अभ्यास करून झोन पाडण्यात येतात. सध्या चार झोन आहेत. हद्दवाढीमुळे या झोनची संख्या पाचपर्यंत होईल असे सांगण्यात येते. झोननुसार नगररचना विभागाकडून घरफाळा आकारणीचे दर निश्‍चित केले जातात. त्यानंतर मोजमाप करून मालमत्ताधारकांना पूर्वीचा घरफाळा आणि चतुर्थ वार्षिक कर आकारणीनंतरच्या कराची माहिती देणारे बिल पाठविले जाते. त्यावर कोणाची हरकत असेल तर ती नोंदवण्यासाठी मुदत दिली जाते.

दाखल झालेल्या हरकतींची छाननी नगररचना विभागाच्या प्रतिनिधींसमोर होते. दरम्यानच्या मुदतीत हा विषय सभागृहासमोर येतो. प्रशासनाने सुचवलेली कर आकारणीवर सभागृहात चर्चा होते. प्रशासनाने शिफारस केलेली आकारणी आणि लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेवून अंतिम आकारणी निश्‍चित केली जाते. या कर आकारणीतून पालिकेच्या महसूली उत्पन्नात वाढ होते. सध्या 4 कोटी 20 लाखापर्यंतचा महसूल कर आकारणीतून पालिकेला मिळतो. चतुर्थ वार्षिक कर आकारणीनंतर प्रशासनाला या महसुलात वाढ अपेक्षित असून घरफाळ्यातील ही वाढ किती टक्के असणार, यासाठी नागरिकांना आता काही महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

नव्या हद्दीत नोंदणीचा घोळ... 
वाढीव हद्दीतील मालमत्तांच्या कराची वसूली यंदापुरती बड्याचीवाडी ग्रामपंचायतीप्रमाणेच सुरू आहे. परंतु वाढीव हद्दीतील मालमत्तांच्या नोंदणीत घोळ असल्याचे बोलले जाते. काही इमारतींची नोंदणीच ग्रामपंचायतीच्या दप्तरी नसल्याचे समजते. खुल्या जागांवर इमारती उभ्या राहूनसुद्धा अजूनही खुल्या जागेचीच करवसूली सुरू आहे. यावर्षी पालिका उत्पन्नात जितकी वाढ अपेक्षित होती, ती वाढ या कारणांमुळे नसल्याने शंका उपस्थित होत आहे. वाढीव हद्दीतील एका जागेवर तीन मजली इमारत उभारूनही ग्रामपंचायत दप्तरी केवळ 500 रूपयेच कराची नोंद असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. चतुर्थ वार्षिक आकारणीत अशा मालमत्ता आता कराच्या अखत्यारीत येणार आहेत. म्हणजेच वाढीव हद्दीतील करातून मिळणारी वाढ ही 2020-21 या वर्षातील पालिकेच्या महसुलात दिसणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com