esakal | हिंम्मत असेल तर..; 'FRP'वरुन सदाभाऊंचा राजू शेट्टींना अप्रत्यक्ष टोला
sakal

बोलून बातमी शोधा

हिंम्मत असेल तर..; 'FRP'वरुन सदाभाऊंचा राजू शेट्टींना अप्रत्यक्ष टोला

'आंदोलनाची टमकी वाजवणाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोध आंदोलन करा'

हिंम्मत असेल तर..; 'FRP'वरुन सदाभाऊंचा राजू शेट्टींना अप्रत्यक्ष टोला

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्याची इच्छा केंद्र सरकारची नाही. याउलट राज्य शासनचीच एफआरपीचे तीन तुकडे करण्याची भूमिका आहे, त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन करावे. शेतकऱ्यांची विनाकारण दिशाभूल करू नये. हिंम्मत असेल तर राज्य सरकारमधून बाहेर पडावे, असा टोला माजी कृषी पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज राजू शेट्टी यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत लगावला.

हेही वाचा: सोबत आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर...- राऊतांचा राष्ट्रवादी-काँग्रेसला इशारा

एफआरपीची रक्कमही तीन टप्प्यात दिली जाते यात पहिला हप्ता ६० टक्के तर दोन महिन्यात दुसरा हप्ता २० टक्के हंगाम संपल्यानंतर उर्वरीत हप्ता दिला जातो. हा केंद्र सरकारचे असे टप्पे करणार असल्याचे सुचवते, काही मंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तसेच केंद्र सरकारला (Central Government) गुढगे टेकायला लावू अशा वल्गनाही केल्या आहेत, मात्र वास्तविक राज्य शासनाने निती आयोगाकडे तीन टप्प्यांची मागणी केली आहे. त्यामुळे राज्य शासनाचा एफआरपीचे तीन तुकडे करून देण्याची भूमिकाही शेतकरी हिताच्या विरोधात आहेत. त्यामुळे आंदोलनाची टमकी वाजवणाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोध आंदोलन करावे. तसेच त्यांनी सरकारचा पाठींबा काढून घ्यावा असेही सदाभाऊ यांनी सुचीत केले.

हेही वाचा: चक्रीवादळांचे नाव कसं ठरवलं जातं?, जाणून घ्या

एफआरपीच्याबाबत राज्य शासनाच्या भूमिकेला विरोध करत आहेत. त्याबरोबर एफआरपी बाबत केंद्र सरकारची भूमिके बाबत शेतकऱ्यांची जागृती करण्यासाठी तसेच राज्य शासनाची तीन टप्प्यातील एफआरपीची भूमिका याबाबत येत्या ५ आक्टोबरला सोलापूरमधून ‘जागर एफआरपीचा व एल्गार शेतकऱ्यांचा’ ही संकल्पना घेऊन सोलापूरातून जागर मोर्चा काढणार आहोत. टप्प्या टप्प्याने असे मोर्चे अन्य जिल्ह्यातही काढले जाणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

loading image
go to top