फेसबुकवरून फर्निचर शाॅपिंग पडले महागात; 3 लाखांचा फटका

बँक शाखाधिकाऱ्याची फसवणूक; गुन्हा दाखल
फेसबुकवरून फर्निचर शाॅपिंग पडले महागात; 3 लाखांचा फटका

इस्लामपूर (सांगली) : स्वस्तात फर्निचर विक्रीचे आमिष दाखवून तसेच ‘सीआयएसएफ'मध्ये नोकरीस असल्याचे खोटे सांगून सुमारे ३ लाख २ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार आज इस्लामपूर (Ishlampur)पोलिसांत दाखल झाली आहे. याप्रकरणी अजित कुमार (Ajit Kumar)याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,

फिर्यादी हे बँक शाखाधिकारी आहेत. १८ जुलैला फेसबुक खात्यावर त्यांना अजित कुमार याच्या नावाने एक ‘पोस्ट' दिसली. ज्यामध्ये त्याने मी ‘सीआयएसएफ' मुंबई विमानतळ येथे नोकरीस असून, त्याचे फर्निचर विकायचे आहे, असे म्हटले होते. खाली संपर्क क्रमांक दिला होता. त्याला संपर्क साधला. हे सामान ४० हजारांना विकायचे असल्याचे त्याने फोनवर सांगितले. हे सामान सीआयएसएफ ट्रान्सपोर्टने पाठवतो असे सांगून त्यासाठी त्याने ज्यादा ३१५० रुपये इमरान नावाच्या व्यक्तीच्या ‘पेटीएम'वर पाठवण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे पाठवले. त्याची व्हाट्सॲपवर एक रिसीट आली. त्यामध्ये जीएसटीचे ९,९९९ रुपये लिहिले होते. तीही रक्कम इमरानच्या खात्यात पाठवण्यास सांगितल्यावर ती पाठवली.

त्यानंतर फोन आला व ही रक्कम एकत्र पाठवायची नसून ९००० व ९९९ असे पाठवण्यास सांगितले. तेही पाठवले. त्यानंतर पुन्हा १६८५२ रुपये इमरानच्या खात्यात पाठवण्यास सांगितले. त्यानंतर ‘जीपीएस'चे कारण सांगून पुन्हा २१९९० रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने ठरलेल्या व्यवहाराचे ४० हजार रुपये एकत्र संजय सिंग यांच्या खात्यात पाठवण्यास सांगितले. फिर्यादीने तेही पाठवले. त्यानंतर पुन्हा जीपीएस सिस्टीम मॅच होत नाही, असे सांगून २१९९० रुपयांची मागणी केली, तर पुन्हा ‘जीपीएस'चे कारण सांगून ७१११० जनार्दन सिंग यांच्या खात्यात जमा करायला सांगितले. पुन्हा ‘जीपीएस'चे करण २६९१० रुपयांची मागणी केली. तसेच मोनू प्रसाद यांच्या खात्यात ९९,७०५ रुपयांची मागणी केली.

फेसबुकवरून फर्निचर शाॅपिंग पडले महागात; 3 लाखांचा फटका
नऊ ऑगस्टच्या बैठकीत पुढील निर्णय; संभाजीराजे

फिर्यादीने भावाच्या खात्यातून ती रक्कम पाठवली. पुन्हा जीपीएस सिस्टीम लॉस झाल्याचे कारण देत अमित कुमारने पुन्हा तुमची रक्कम रिफंड करायची आहे, त्याची फाईल तयार करायची आहे, असे सांगून पुन्हा ३ हजारांची मागणी केली. सामान येईल या आशेने हे वारंवार रक्कम जमा करत राहिले, परंतु नंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. एकूण ३ लाख २ हजार ७०५ रुपयांची फसवणूक झाली आहे. घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसांत झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयितांची नावेही खोटी असण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com