अ‍ॅड. कविता मोहरकर यांनी मिसेस युनिव्हर्स-वर्सिटी हा पुरस्कार पटकावला

साऊथ कोरीयाची राजधानी सेऊल येथे पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील अ‍ॅड. कविता मोहरकर यांनी मिसेस युनिव्हर्स-वर्सिटी हा पुरस्कार पटकावला
Gadchiroli district Kavita Moharkar Mrs Universe
Gadchiroli district Kavita Moharkar Mrs Universesakal

गडचिरोली : साऊथ कोरीयाची राजधानी सेऊल येथे पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील अ‍ॅड. कविता मोहरकर यांनी मिसेस युनिव्हर्स-वर्सिटी हा पुरस्कार पटकावला आहे. या सौंदर्य स्पर्धेत जगभरातील १०० देशांतील सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान नॅशनल कास्च्युम, इव्हिनिंग गाऊन, स्विम सुट व प्रेझेंटेशन राउंड पार पडले. अ‍ॅड. मोहरकर यांनी प्रेझेंटेशन राउंडमध्ये कौटुंबिक कलह या विषयावर तेजस्वी भाषण करत बाजी मारली.

त्यांना मिसेस युनिव्हर्स-वर्सिटी हा सन्मान, मुकूट तसेच मानपत्र देण्यात आले. तसेच प्रेझेंटेशन राउंडमधील प्रभावी वक्तृत्वासाठी साऊथ पॅसिफिक एशिया हा खिताब देण्यात आला. या सोहळ्यात त्यांच्या नॅशनल कॉस्च्युमचेही कौतुक झाले. त्यांनी तथागत भगवान बुद्धाची शिष्या आम्रपालीची वेशभूषा साकारली होती. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com