esakal | यंदा सांगलीतील 'या' गावात होणार नाही गणेशोत्सव 
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh utsav 2020 cancelled in sangli navakheda village

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याबाबत पोलीस प्रशासन व तरुण मंडळे यांची बैठक झाली.

यंदा सांगलीतील 'या' गावात होणार नाही गणेशोत्सव 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवेखेड : नवेखेड (ता. वाळवा) येथे सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय  तरुणांच्या  झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही माहिती सरपंच प्रदीप चव्हाण यांनी दिली.
 

सरपंच प्रदिप चव्हाण  म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याबाबत पोलीस प्रशासन व तरुण मंडळे यांची बैठक झाली. त्यामध्ये या वर्षी गावात सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत करायचा नाही. त्या ऐवजी आपापल्या घरी गणेशोत्सव साजरा करावा असे ठरले. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याला पाठींबा देत रद्दच्या निर्णयावर शिक्का मोर्तब झाले.

हे पण वाचावाळवा पंचायत समितीच्या आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा

कोरोनाचा सामना नवेखेड ग्रामस्थ गेली पाच महिने करीत आहेत. लोकांनी नियम पाळून दैनंदिन व्यवहार सुरू ठेवले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव रद्दचा निर्णय गावच्या एकीचे प्रतीक आहे. 
यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top